नवापूर महाविद्यालयातील रासेयो च्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन-----‐------

नवापूर:- सत्यप्रकाश न्युज 
    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग जळगाव व कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी  श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दिनांक ३ मार्च २०२२ दत्तक गाव मौजे मुगधन येथे करण्यात आले. 
राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. विशाल करपे यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे जि. समन्वयक डॉ.विजय पाटील होते. 
कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती दिलीप आर. गावीत, आमपाडा गावचे सरपंच सौ. रमिला ताई गावित, उपसरपंच श्री. गुलाब गावीत, आमपाडा गावचे पास्टर श्री. आलुभाई गावीत, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुभाष शंकर गावीत, श्री. सुभाष डी. गावीत, गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री. रावल्या रेवजी गावित, श्री. चिकु नत्थु गावीत, श्री. अरविंद गावीत, श्री. शिवा मौल्या गावीत  उपस्थित होते. 
     उद्घाटनीय भाषणामध्ये रासेयो विभागीय समन्वयक डॉ.विशाल करपे यांनी स्वयंसेवकांना शिस्तीचे, नीतिमत्तेचे व आदर्श नागरिक घडण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व पटवून दिले. 
स्वयंसेवकांची प्रामाणिकता, स्वयंसेवकांची सामाजिक कार्याशी कटिबद्धता इत्यादी विषयावर अध्यक्षीय भाषणातून जिल्हा समन्वयक डॉ. विजय पाटील यांनी आपले मत मांडले.
   स्वयंसेवकाशी हितगुज करत असताना श्री. दिलीप गावीत यांनी आदिवासी समाजातील व्यसन मुक्तता, शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे  भूमिका, सामाजिक बांधिलकी, राष्ट्प्रेम इत्यादी विषयावर स्वयंसेवकाशी संवाद साधला.
   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी डॉ. छाया गावीत यांनी तर आभारप्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. ई.एस. गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.  ए. ए. मुळे यांनी पार पाडली.
    शिबिराच्या यशस्वीतेसाठी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.जी.जयस्वाल, उपप्राचार्य प्रा. वाय. जी. भदाणे, डॉ. मंदा गावीत यांनी शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post