सूररत्न संगित विद्यालयात संगित परिक्षा संपन्न--‐-------------------------------------- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल परीक्षार्थी उत्साहात------‐----

नवापूर  सत्यप्रकाश न्युज 
  दि. 5 मार्च 2022 रोजी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई संचलित सूर रत्न संगीत विद्यालय, नवापूर येथे संगीत परीक्षा संपन्न झाली. संगीत परीक्षक श्री स्वप्निल खैरनार यांचा सत्कार संचालिका रत्ना रामोळे व संगीत शिक्षक भानुदास रामोळे यांनी सपत्नीक केला. ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व बापूजी खैरनार यांचा सत्कार सुरेश भोई व कल्पना भोई, कल्याण यांनी सपत्नीक केला. जिल्हा परिषद शाळा वासरवेल येथील मुख्याध्यापक ताई गावीत यांचा सत्कार कल्पना भोई यांनी केला.
प्रारंभिक ते मध्यमा प्रथम पर्यंत संगीत परीक्षा आज रोजी संपन्न झाल्या. नवापूर तालुक्यात शास्त्रीय संगीत शिक्षण सूर रत्न विद्यालयामुळे सहज शक्य होत आहे. 
     याप्रसंगी ब्लेसी गावीत, मनिष गावीत, प्रियंशी गावीत, स्नेहल गावीत, अंजली गावीत, तेजस्विनी गावीत, कुशलकुमार माळी, गौरी खैरनार, संगीता देसले, अर्चना धोत्रे,राकेश ईशी, जागृती पाटील, ज्योती कापूरे, प्रदीप पाटील या विद्यार्थ्यांची संगीत परीक्षा संपन्न झाली. हार्मोनियम संगत भानुदास रामोळे व तबला वादन सुधांशू रामोळे यांनी केले. विशेष सहकार्य शंकर साठे यांनी केले.
वासरवेल येथून विद्यार्थी पालक सीमा गावीत, गीता गावीत, राहुल गावीत, समुवेल गावीत उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून डी.आर.रामोळे, सुरेश भोई, बाळकिसन ठोंबरे,डॉ.नितीनकुमार माळी, प्रकाश खैरनार, सुप्रिया भोई, कल्पना भोई उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण बाब म्हणजे नंदूरबार जिल्हा परिषद शाळांमधील एकमेव वासरवेल शाळेतील विद्यार्थी गांधर्व शास्त्रीय संगीत परीक्षा देत आहेत.
   आज संपन्न झालेल्या बालगंधर्व महाविद्यालय संचलित सूररत्न संगित महाविद्यालयाने आमच्या ग्रामीण भागात संगीताचे धडे शिकण्याची संधी उपलब्ध करून उत्साह वाढविण्यालाबद्दल मार्गदर्शक भानुदास रामोळे,सौ.रत्ना रामोळे व परिक्षक स्वप्नील खैरनार यांचे धन्यवाद. 
           राहुल गावित, पालक, वासरवेल 

Post a Comment

Previous Post Next Post