नंदुरबार, दि.10 (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यालयाकडून तळोदा, अक्कलकुवा व धडगाव कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून सन 2022-2023 या वर्षांसाठी इयत्ता पहिली व दूसरीसाठी नामांकित इंग्रजी माध्यामाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर प्राप्त अर्जाची छाननी अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्यातआली असून अंतिम निवड याद्या खालील तारखेला तालुकानिहाय प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती एन.एम.साबळे, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण ) यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील याद्या 13 ते 15 जून, 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तर याद्यावर आक्षेप नोंदविण्याचा दिनांक 15 ते 24 जून 2022 असेल. धडगाव तालुक्यातील याद्या 16 ते 19 जून,2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तर याद्यावर आक्षेप नोंदविण्याचा दिनांक 20 ते 30 जून,2022 असेल.तर तळोदा तालुक्यातील याद्या 20 ते 22 जून,2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून आक्षेप नोंदविण्याचा दिनांक 23 जून ते 1 जुलै 2022 असा राहील.
अर्जदारांनी आपल्या तालुक्याच्या याद्या ज्या दिवशी प्रसिद्ध होतील त्या दिवशी हजर राहावे. मुदतीनंतर आलेल्या आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही. अर्जधारकांनी अंतिम यादीबाबत आक्षेप असल्यास तसा लेखी अर्ज व आक्षेपाबाबतची कागदपत्रे सोबत जोडावे.असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा यांनी केले आहे.