शिरपूर- सुरत बसच्या एक सीटखाली सुमारे ८० हजार आठ किलो इतका गांजा असलेली बॅग आढळून आल्याने नवापूर बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सदरची बॅग नवापूर पोलीसांनी जप्त केली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गांजा तस्करीचे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नवापूर बसस्थानकावर काल सायंकाळी शिरपूर-सुरत बस आली असता एका सीटखाली एक बॅग असल्याचे वाहकाच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी सदरची बॅग उघडून पाहिली असता त्यात गांजा असल्याचे निदर्शनास आले. यामुळे
त्यांनी सदरची बॅग बसस्थानकावर वाहतूक निरीक्षक सचिन पाटील यांच्याकडे जमा केली. बसमधील प्रवाश्यांना दुसऱ्या बसने रवाना करण्यात आले.सदर घटनेची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना देण्यात आली. त्यानंतर नवापूर आगार प्रमुखांनीनवापूर पोलीसांत गुन्हा तस्करीचे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पंचनामा केला. त्यात बसमधील आठ किलो वजनाचा सुका गांजा आढळून आला असून त्याची किंमत सुमारे ८० हजार रुपये इतकी असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांनी दिली.
नवापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या पथकाने बस स्थानकावरून गांजा पोलीस ठाण्यात नेत गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांच्या कारवाई दरम्यान बसस्थानकावर मोठी गर्दी झाली होती. बसमध्ये अशा पद्धतीने गांजा मिळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बसमधून गांजा तस्करीचे रॅकेट तर सक्रीय नाही ना? असाही सवाल उपस्थित करण्यात येत असून नवापूर पोलीस कसून चौकशी करत आहेत.