... मराठी साहित्य प्रचार व प्रसारासाठी काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. "काव्य परिक्रमा" हा असाच वेगळा आणि अनोखा उपक्रम आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवराज्यभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला ४ जून २०२२ रोजी सकाळी ८ वाजता सदर कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मंचर येथील सुप्रसिध्द कवी तथा जादूगार महमंद शकील जाफरी यांनी भूषविले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी त्यांच्या पुतळ्यास महावस्त्र अर्पण करून सदर काव्यपरिक्रमाला सुरूवात झाली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके, संस्थापक सचिव कालिदास चवडेकर, उपाध्यक्ष पी.नंदकिशोर व राज भिंगारे, कोष्याध्यक्ष कृष्णा शिंदे, सहसचिव दीपक सपकाळ, कार्यकारिणीचे सदस्य राष्ट्रपाल सावंत, सौ.जया नेरे, भाऊसाहेब सोनवणे, संदीप वाघोले, रामदास देशमुख, पुणे विभागीय अध्यक्ष नवनाथ खरात, नवनाथ गाडेकर, सरिता कलढोणे व उपस्थित अन्य कवींनी शिवकाव्य सादरीकरण करून शिवरायांच्या चरणी काव्यफुले अर्पीले.
अतिथी संयोजक संदीप वाघोले यांच्या उत्कृष्ट नियोजनात संपन्न झालेल्या काव्यपरिक्रमांतर्गत कवी संमेलन वर्षभरात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखांना संपन्न होऊन काव्य परिक्रमा पूर्ण होणार आहे. असे काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके, संस्थापक सचिव कालिदास चवडेकर, मुख्य संयोजक कृष्णा शिंदे यांनी सांगितले आहे.