जिल्हा परिषद शाळा आमलाण येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेतलेले विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण व स्नेहभोजन कार्यक्रम नुकताच पार पडला.....

जिल्हा परिषद शाळा आमलाण येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेतलेले विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण व स्नेहभोजन कार्यक्रम नुकताच पार पडला.....    नवापूर- सत्यप्रकाश न्यूज 
    गेल्या अनेक दिवसापासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना विलास गावित व अल्पेश गावित यांनी 2430 रुपयाचे विविध शालेय साहित्य बक्षीस रूपात वाटप केले...
   तसेच विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहार स्नेहभोजनातून विविध शिक्षण प्रेमीच्या देणगीतून देण्यात आले त्यामध्ये गावचे सरपंच राजेश कोकणी ,विजय गावित, दिलीप वसावे ,आनंद वसावे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक दामू  वसावे,राजू वसावे, गोविंद वसावे ,युसुफ गावित, किसन गावित ,मिलिंद गावित, भिकन वसावे, अनिल वसावे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक इत्यादींनी   देणगी जमा करत विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाचा आस्वाद दिला...
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बाळकिसन ठोंबरे यांनी केले तर शाळेच्या वतीने आलका पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post