कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांसाठी...
अर्ज सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार, दि.24 (जिमाका वृत्तसेवा) : मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून विविध पिकांच्या मुल्यसाखळी विकासाची उत्पादक भागीदारी उपप्रकल्पासाठी 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर प्रकल्पातंर्गत जिल्ह्यात यापूर्वी 7 समूदाय आधारीत संस्थाना यापूर्वी राज्यस्तरावरुन प्राथमिक मान्यता देण्यात आली असून आता नवीन 8 प्रकल्पांना मंजुरीसाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यानी अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकटी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियांनातर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे.
प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाचे 60 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येईल. अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल. अर्ज सादर करण्यासाठीचे पात्रतेचे निकष व अर्जाचा नमुना आदी माहितीसाठी https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर तसेच प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नंदुरबार कार्यालयात उपलब्ध आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा ) तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
00000
Tags:
कृषी