वस्तू व सेवा कर कायद्याचा सखोल अभ्यास करावा... तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून मुदतीत कामे संपवा - सुमेर कुमार काले
नाशिक सत्यप्रकाश न्युज
कोणत्याही क्षेत्रामध्ये ठराविक वेळेनंतर बदल होत असतात व हे बदल सद्य परिस्थिती नुसार आवश्यकही असतात जीएसटी कायदा आल्यापासून तर तो सर्वांना समजून घेण्यापर्यंत त्यात सातत्याने बदल होत गेले त्यामुळे आपल्याला वस्तू व सेवा कर कायदा समजून घेणे व त्याचा नियमित अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे तरच आपण यशस्वी कर सल्लागार होऊ शकतो असे प्रतिपादन _सुमेर कुमार काले_ यांनी नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, गुड्स अँड सर्विस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्यावतीने आयोजित "कर व्यवसायिकांसाठी युक्तीच्या चार गोष्टी" या वेबिनारच्या चर्चासत्रात त्यांनी केले.
कर सल्लागार म्हणून काम करत असताना कोणते काम केले पाहिजे व ते कधी केले पाहिजे याचे काटेकोरपणे नियोजन केले पाहिजे,
विविध कामे करत असताना प्रत्येक कामाची मुदत लक्षात घेऊन त्यानुसार कामाचे नियोजन करा व वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे त्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा.
कर सल्लागारांचे जीवनमान अतिशय धकाधकीचे झालेले आहे कायद्यांमध्ये होत असलेले वारंवार बदल हे समजून घेऊन आपल्या क्लाइंटला योग्य पद्धतीने समजावून सांगून वेळेत काम पूर्ण करावे लागत आहे. वस्तू व सेवा कर कायद्याचे अद्यावत माहिती असणे तसेच त्याचा नियमित अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी आपण हाताळत असताना आपली दैनंदिन जीवनशैली व ऑफिसचे कामकाज यामध्ये समतोल साधता आला पाहिजे. प्रत्येक काम हे आनंदाने व उत्साहाने करता आले पाहिजे, मुदतीत काम संपवायच्या मागे आपले वैयक्तिक आयुष्य देखील जपता आले पाहिजे, शक्य होईल तेवढेच काम करण्याचा प्रयत्न करा व आपले आरोग्य ही जपा अस मत त्यांनी व्यक्त केले.
या सर्व गोष्टींचे व्यवस्थित रित्या नियोजन करता आले तरच तुम्ही यशस्वी कर सल्लागार होऊ शकतात व आपले काम उत्तम पद्धतीने हाताळू शकतात असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व नाशिक मधील वरिष्ठ कर सल्लागार अनिल चव्हाण यांनी यशस्वी व उत्तम कर सल्लागार कसे होऊ शकता याबद्दल मार्गदर्शन केले तसेच कर सल्लागार हे नेहमीच व्यवसायिक उद्योजकांसाठी मोलाचे काम करत असतात परंतु कर सल्लागारांसाठी या विशेष कार्यक्रमाचे नियोजन केले त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
पुणे येथील ॲड. व तज्ञ कर सल्लागार नरेंद्र सोनवणे यांनी कर क्षेत्रातल्या बदल्यामुळे बदललेली व्यवसाय कार्यपद्धती याबद्दल मार्गदर्शन केले
शेवटच्या सत्रात,
व्यवसायातल्या जबाबदाऱ्या आणि त्यासाठीचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करताना ऍड. श्री किशोरजी लुल्ला म्हणाले, "करसल्लागारांनी आपली स्वतःची इच्छाशक्ती ओळखण्याची गरज असून, आपलं पॅशन काय आहे ते आपण ओळखलं पाहिजे, आपल्या मनामध्ये अशी इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी मनशांती किंवा मनशक्ती सारखे प्रयोग आपण केले पाहिजेत. स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कुटुंबाला आपण प्रथम प्राधान्य द्यावं, केवळ पैशामागे धावता कामा नये तर, जेवढे गरजेचं आहे तेवढाच व्यवसायाचा व्याप वाढवा आणि सुखी रहा. आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये प्रत्येक बारीक सारीक गोष्टींच्या नोंदी घ्यायला शिका. जेणेकरून आपल्याकडून कोणतंही काम राहून जाणार नाही"
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीनजी डोंगरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन ॲड. प्रदीप क्षत्रिय यांनी केले.
या कार्यक्रमासाठी श्री श्रीपादजी बेदरकर, श्री प्रकाश जी विसपुते, श्री अनिकेत कुलकर्णी, श्री अक्षय सोनजे, तसेच मीडियाचे श्री योगेश कातकडे यांचेसह नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
Tags:
व्यावसायिक