नवापूर सत्यप्रकाश न्यूज
शहरासह तालुक्यातील व शेजारील गुजरात राज्यातील जंगलात मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. नवापूर तालुक्यातील खोकसा पट्ट्यातील शेतातील पिके अधिक पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडली असून, शेतकरी हतबल झाले आहेत. पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तसेच चरणमाळ घाटात जोरदार पाऊस असल्याने नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील रायपूर- प्रतापपूर गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पूर्व व दक्षिण भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. धुळे-सुरत महामार्गावरील वाहतूकही धिम्या गतीने सुरू असल्याने वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रंगावली नदीलाही पर आला असन.
नवापूर तालुक्यातील खोकसा भागात अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने शेतकयांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके वाहून गेल्याने या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला असून उत्पन्न मिळणार नसल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील नागझिरी येथील रंगावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे. नवापूर शहरातील नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून व नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जुलै महिन्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. तालुका प्रशासन सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Tags:
नैसर्गिक