रायपूर विद्यालयात शिक्षण परिषद संपन्न.....

रायपूर विद्यालयात शिक्षण परिषद संपन्न...............
नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
    आदिवासी ज्ञानपीठ नवापूर संचलितआदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रायपूर ता.नवापूर व जि प.शाळा बोरविहीर यांच्या संयुक्त विद्यमाने रायपूर केंद्रातील शिक्षण परिषद आदर्श माध्यमिक विद्यालय रायपूर ता नवापुर येथे संपन्न झाली.प्रारंभी ईशस्तवन करून परिषदेस सुरूवात केली.  शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी मा.श्रीमती पवार मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी पं.स नवापुर ह्या होत्या.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनींनी स्वागतगीत सादर केले.परिषदेस प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक एस व्ही गावीत,मान्यवर,केंद्रातील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
शिक्षण परिषदेस विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यात बालाजी बारीश, व्ही व्ही पाटील, रविदास गावीत,वनकर गावीत,महेंद्र पाटील यांनी मागील आढावा,पालक परिषद,पी.जी.आय निदर्शके, शैक्षणिक विकासात येणारी समस्या,शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत विद्यार्थ्यांचे शिक्षण,माझे वर्ग व माझे नियोजन,विद्याप्रवेश यांविषयी मार्गदर्शन केले.तसेच मा.श्रीमती पवार मॅडम यांनी शिक्षण परिषदेतील विषयांच्या  प्रत्यक्ष अध्यापनात उपयोग कसा करून घ्यावा?तसेच त्यांच्या अध्ययन कृतींचे मूल्यमापन यावर मार्गदर्शनपर विचार सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे के सोनवणे यांनी तर मान्यवर व उपस्थित शिक्षक बंधू भगिनीचे आभार प्रा.शितल पाटील यांनी मानले.यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post