येथील संतश्री जलाराम बाप्पा भक्त मंडळा तर्फे सालाबादा प्रमाणे याही वर्षी गुजरात चे महान संत प.पू.श्री.जलाराम बापांची २२३ जयंती मोठ्या थाटामाटात जलाराम मंदिर, शीतल सोसायटी येथे साजरी करण्यात आली.
या वेळेस खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बापाच्या मुर्तीचे अभिषेक पासून सुरुवात करण्यात आली तदनंतर पहाटे ४:०० प्रभात फेरी पहाटे सकाळी श्रीचा शांतीहोम
दुपारी कढि खिचडीचा महाप्रसादाचे असंख्य भाविकांनी लाभ घेतला संध्याकाळी महिला मंडळातर्फे जलाराम बावनी भजन कीर्तन.संध्याकाळी 6:30 महाआरती करण्यात आली.जलारामबाप्पा जयंती उत्सव थाटामाटात संपन्न झाला.
आज जलाराम जयंतीनिमित्त शितल सोसायटीत असलेला जलारामबापा मंदिरात बापाच्या भक्तांची दर्शनाला सुरुवात झाली होती व मंदिरात देखील आकर्षक रोषणाई केल्याने मंदिरातील प्रसन्न वातावरण होते.
शहरातील असंख्य भाविकांसह शहरातील आ.शिरिषकुमार नाईक, माजी नगरसेविका मीराबेन विपिनभाई चोखावाला ,सामाजिक कार्यकर्ते किरण टिभे,दिपक वसावे , माजीनगरसेवक राजेश गावित, विजय लोहार ,राजुभाई अग्रवाल चेतन प्रजापत, पत्रकार हेमंत पाटील, हेमंत जाधव, मंगेश येवले,आदिंनी भेटि दिल्या
कार्यक्रम संपन्न होण्यासाठि
श्री जलाराम मंदिर,शीतल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष ए.झेड.शिंपी,अध्यक्ष परागभाई ठक्कर, कार्याध्यक्ष कमलेशभाई शाह,सचिव कमलेशभाई काचवाला,कोषाध्यक्ष सौ.वर्षाबेन ठक्कर, संचालक दिपक मिस्त्री,नवीन पंचाल,हेमंत शाह, मिलिंद चव्हाण, बालम लोहार, मुकेश तबलावाला, आशिष ठक्कर, भावनाबेन काचवाला आदिंनी परिश्रम केले.
Tags:
धार्मिक