गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठयाची नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, वाहनासह तीस लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त

नंदूरबार(सत्यप्रकाश न्युज):-गोवा राज्यातील विदेशी मद्य साठ्याची महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या बेकायदेशीर वाहतुकीच्या विरोधात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग नाशिक यांच्या पथकाने दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील  प्रकाशा येथे, अक्कलकुवा रस्त्यालगत, प्रकाशा शिवार या ठिकाणी वाहनतपासणी सापळा रचुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतीबंधीत तसेच गोवा राज्यात निर्मीत व केवळ गोवा राज्यातच विक्री करीता असलेला तीस लक्ष 67 हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन पिकअप वाहणासह जप्त करण्यात आला आहे,
याबाबत आरोपिता विरोधत गुन्हा. रजि.क्र.
337/2023 गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जप्त करण्यात आलेल्या परराज्यातील विदेशी मद्य 2.592 ब.ली.(गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्य 300 बॉक्स) जप्त करण्यात आलेले वाहन महिंद्रा कंपनी बोलेरो मॅक्स पीकअप MH.18.BZ 0851 एक मोबाइल संच,
जप्त मुद्येमालाची किंमत 30 लक्ष 67 हजार रुपये यातील आरोपी सागर शांतीलाल सैंदाणे (वाहनचालक), वय 28 वर्षे, राहणार संत गाडगेनगर, बोराडी, ता. शिरपुर, जि.धुळे, कमलेश सुभाष पाटील, राहणार मु.पो. बोराडी ता. शिरपुर
जि. धुळे हा (फरार) आहे, मद्य पुरवठा दार
विणा (पुर्ण नाव माहित नाही) (फरार) मद्य घेणारा सदर वाहन क्र.MH.18.BZ 0851 चे मालक व संशयीत
पाहिजेत ज्ञात अज्ञात इसम फरार सदरची कारवाई डॉ. विजय सुर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनील चव्हाण संचालक (अं.वद) महाराष्ट्र राज्य मुंबई, डॉ. बा.ह. तडवी विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक, तसेच श्रीमती स्नेहा सराफ अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए.जी. सराफ, व्ही.बी. पाटील, जवान भाऊसाहेब घुले, धनराज पवार, महेश सातपुते यांनी केली आहे, सदरील गुन्हयाचा पुढील तपास व्ही.बी. पाटील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहेत. तरी जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, अवैद्य मद्य निर्माती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र.१८००२३३९९९९ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००१९३३ तसेच दुर ध्वनी क्र. ०२५३/ २३९९७४४ वर संपर्क साधावा. असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग नंदुरबार यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post