खासगी शाळातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांना निवडणूक काळातील दीर्घ सुट्टी न दिल्यामुळे त्या कालावधीतील विशेष रजांच्या रजा रोखिकरणास अनुमती देणे किंवा त्या विशेष रजांची अर्जित रजा म्हणून सेवा पुस्तिकेत नोंद करणेबाबत.. संदर्भ : आपले पत्र क्र. निउजी / कावि ६४, निवडणूक-२०२४ दि. १८, मार्च, २०२४.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने आपल्या आदेशान्वये धुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी हजारो अधिकारी / कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध माध्यमाच्या / विविध आस्थापनाच्या) विविध बोर्डाच्या / विविध विद्यापीठाच्या अनुदानित/ विना अनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळा / कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक/शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना उन्हाळी दीर्घ सुट्टी न देणे बाबतचे आणि मुख्यालय सोडण्याची परवानगी न देणेबाबतचे आस्थापना प्रमुखांना आपले आदेश निर्गमित झालेले आहेत. निवडणूक व जनगणना यशस्वीरित्या पार पाडणे ही आपली सर्वाची नैतिक जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्यही आहे. शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी यांना दीर्घ सुट्टी कालावधीतील या विशेष रजांचे रजा रोखिकरण करता येते किंवा रजा उपभोगता येते पण खासगी मान्यता प्राप्त प्राथमिक/ माध्यमिक शाळा व कनिष्ट/वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांना दीर्घ सुट्टी कालावधीतील विशेष रजांचें रोखीकरण करता येत नाही आणि त्या रजा उपभोगता देखील येत नाही. निवडणूक कालावधीत दि. ४ जून, २०२४ पर्यत प्राध्यापक / शिक्षक / क्षिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या आदेशान्वये मुख्यालयी थांबणार आहेत आणि निवडणूक कामकाजात सक्रिय भाग देखील घेणार आहेत म्हणून या निवडणुक कालावधीतील विशेष रजांच रोखिकरण करण्यासाठी किंवा या विशेष रजांची अर्जित रजा म्हणून सेवापुस्तिकेत नोंद करणेसाठी आस्थापना प्रमुखांना आदेश निर्गमत करावेत ही विनंती भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीचे स़ंयोजक महेश मुळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे
Tags:
शैक्षणिक