येथे पूर्वीचा मुंबई विक्रीकर कायदा, त्यानंतर २००६ पासून अस्तित्वात आलेला व्हॅट कायदा आणि सन २०१७ पासून संपूर्ण देशामध्ये "एक राष्ट्र-एक कर" या तत्वावर आधारित असलेला वस्तू व सेवा कर कायद्याची राज्यात सुरुवात झाली.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, भौगोलिकरीत्या विचार केल्यास, क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा
हा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
लोकसंख्येचा तसेच जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय, सहकार क्षेत्राचा विचार करता राज्य सरकारला या जिल्ह्यातून, मोठ्या प्रमाणावर महसुली उत्पन्न मिळत असते.
जिल्ह्याचा वाढता विस्तार बघता, गेल्या अनेक वर्षांपासून विक्रीकराचे बाबतीत, जिल्ह्यातील व्यापारी, करसल्लागारांना, करदात्यांच्या अपिलीय कामकाजासाठी नाशिक, पुणे येथे जावे लागत होते.
या बाबतीत, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या पुढाकाराने आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने अहमदनगर येथे स्वतंत्र अपील कामकाज होणेबाबत मुंबई व नाशिक येथील आयुक्त कार्यालयाशी वेळोवेळी चर्चा विनिमय सुद्धा करण्यात आला होता. नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ने या बाबतीत मुख्य विक्रीकर आयुक्त तसेच राज्याचे प्रधान सचिव यांचेकडे या बाबतीत तसेच अहमदनगर जिल्ह्याचा मोठा विस्तार बघता, कोपरगाव, संगमनेर,राहाता, श्रीरामपूर, लोणी, या भागातील व्यापारी,करदात्यांसाठी शिरडी या मध्यवर्ती ठिकाणी राज्य विक्रीकराचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावासोबतच अनेक व्यापारी संघटनांचे प्रस्ताव शासनाकडे सादर झाले होते.
सध्य स्थितीत, नुकतेच या बाबत राज्य विक्रीकर विभागाकडून या मागणीस सकारात्मक प्रतिसाद प्राप्त होऊन, अहमदनगर जिल्ह्यातील करदात्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र अपिलीय विभाग सुरू करण्यात आल्याने, तमाम व्यापारी वर्ग तसेच करसल्लागारांनी आनंद व्यक्त केला.
अहमदनगर वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या अपील विभागासाठी,
श्री भगवान उंडे यांची राज्यकर उपायुक्त (अपील) म्हणून नियुक्ती झाली.
त्या निमित्ताने, अपिलिय उपायुक्त श्री भगवान उंडे तसेच नव्याने रुजू झालेल्या राज्य कर उपायुक्त श्रीमती नेहा देशमुख मॅडम यांचा "अहमदनगर जिल्हा कर सल्लागार संघटनेकडून" यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री किशोर गांधी, श्री सुनील कराळे, उपाध्यक्ष
श्री नितीन डोंगरे उपाध्यक्ष,श्री आनंद लहामगे, श्री पुरुषोत्तम रोहिडा, श्री निलेश चोरबेले,श्री प्रसाद किंबहुने,श्री सोहम बरमेचा, श्री आशिष मुथ्था ,श्री अंबादास गाजूल, श्री सुनील सरोदे,
श्री करण गांधी,श्री अमित पितळे व अहमदनगर जिल्हा कर सल्लागार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील विविध व्यापारी व करदात्यांच्या सुमारे दीड हजाराचे आसपास अपिलीय केसेसचे पेंडिंग असलेले कामकाज यामुळे लवकरच पूर्णत्वास जाऊ शकेल,
तसेच जिल्ह्याच्या ठिकाणीच अपील कामकाजाची सोय निर्माण झाल्यामुळे व्यापारी तसेच कर सल्लागाराना त्यांचे कामकाज वेळेत पूर्ण करणे आता शक्य होऊ शकेल. अपील कामासाठी नाशिक येथे जाण्याची आवश्यकता रहाणार नाही.
असे नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स चे अध्यक्ष श्री नितिन डोंगरे यांनी सांगितले.
तर, अहमदनगर जिल्ह्यातील व्यापारी वर्गाच्या अपील कामासाठी नगर येथून, नाशिक ला जाणे परवडणारे नव्हते, काही वेळेस डिले-कंडोनेशन, रिस्टोरेशन सारख्या अगदी छोट्या कारणासाठी अपील करावे लागले तरी सुद्धा सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक ला जावे लागत असल्याने, व्यापाऱ्यासोबतच, करसल्लागारांना सुद्धा वेळ व पैसे खर्चाचा भुर्दंड पडत होता. यापुढे व्यापारी वर्गासाठी अपील कामकाजाच्या निर्माण झालेल्या सोयीमुळे व्यापारी व कर सल्लागारांना चांगला लाभ होईल असे मत अहमदनगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री किशोर गांधी यांनी सांगितले.
या प्रसंगी, टॅक्स असोसिएशनचे पदाधिकारी व उपस्थितांनी श्री. भगवान उंडे सर व श्रीमती नेहा देशमुख मॅडम यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags:
अर्थविषयक