येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक हायस्कूल व हाजी ए.एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नवापुर एज्यूकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शितलबेन वाणी, संचालक श्री रजनीकांतभाई मिस्त्री, श्री हेमंतभाई शहा, श्री नेमीचंदभाई अग्रवाल, श्री परागभाई ठक्कर, प्राचार्य श्री मिलिंद वाघ सर, उपमुख्याध्यापक श्री नारायण मराठे, पर्यवेक्षक श्री दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख श्रीमती मेघा पाटील, ज्येष्ठ शिक्षक श्री भरत सैदाणे, विजय कदम उपस्थित होते.
स्वच्छता अभियान, व्याख्यान, प्रतिमापूजन,अशा विविध माध्यमांतून जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्रीमती शितलबेन यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व आपल्या शाळेच्या गेल्या ३५ वर्षापासून सूरु असलेल्या शालेय स्वच्छता अभियान उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर संचालक मंडळाने स्वतः हातात झाडू घेऊन प्रभात फेरी मार्ग स्वच्छ केला. विद्यार्थ्यांनी ही शाळेचा परिसर व रस्ते स्वच्छ करून घेतले. विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश महाजन यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद वाघ सर व सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. तर यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी प्रयत्न केल
*******************************
कुष्ठरोग निर्मूलन होणे हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते याच्या आधार घेऊन उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.
सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले डॉ. डॉक्टर अनिल गावित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या देशातून कुष्ठरोगाचे उच्चाटन व्हावे यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे यात नागरिकांनी आपल्याला कुष्ठरोगाची लक्षणे दिसली म्हणजे शरीरावर चट्टा दिसला तर डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेणे आवश्यक आहे त्यातून आपण कुष्ठरोगाचे निदान करू शकतो व समाजात छुपे रुग्ण शोधून काढून त्यांना उपचाराखाली आपण आणू शकतो म्हणून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्याचप्रमाणे स्वच्छते विषयी माहिती देताना सांगितले की आपला परिसर व आपण वैयक्तिक स्वच्छता पाळली पाहिजे त्यामुळे त्यामुळे पसरणारे विषाणू जंतू यांच्या संसर्ग होणार नाही आणि आपले आरोग्य अभाधित राहील
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेचल वळवी यांनी कुष्ठरोग बद्दल मार्गदर्शन करताना सांगितले की कुष्ठरोगामुळे जे अपंगत्व येते त्यावर मात करण्यासाठी समाजातून रुग्ण शोधून काढून त्यांना आपण उपचाराखाली आणावे लवकर निदान व उपचार झाल्यास कुष्ठरोगामुळे येणारे विकृती टाळता येते.
सदर कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इन्चार्ज सिस्टर जोईस वळवी कुष्ठरोग तंत्रज्ञान सुरेश बागुल अनिश वसावे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास माळी यांनी केले व आभार चंद्रकांत पावरा यांनी मानले.
Tags:
सामाजिक