सार्वजनिक गुजराती हायस्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

नवापूर : सत्यप्रकाश न्युज 
   दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सार्वजनिक गुजराती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य श्री संजय कुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख, पर्यवेक्षक श्री फारुख पटेल, उर्दू विभागाचे पर्यवेक्षक श्री जाहिद पठाण, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री संजय                कुमार जाधव सर होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  श्री विपुल प्रजापत यांनी केले. याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषा करून आले होते. शाळेची विद्यार्थिनी सालेहा पटेल हिने सुरुवातीला मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उर्दू विभागाच्या विद्यार्थिनी हनिफा पठाण, मुसर्रत पठाण, खतिजा शेख, नाझिया अन्सारी यांनी गीत गायन केले. कार्यक्रमात पुढे हमजा  कुरेशी या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उर्दू विभागाच्या विद्यार्थिनी अमीना सय्यद,अमरा सिकलगर, सायमा शेख, राबिया मनियार यांनी गीत गायन केले.  निहारिका अग्रवाल व मोहम्मद मन्सुरी यांनी काव्यवाचन केले. कार्यक्रमात पुढे सबानूर शेख, भूमिका दर्जी, शीश सय्यद, हनीफा बलेसरिया यांनी मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी अफिफा बलेसरिया व तुलसी प्रजापत यांनी केले व आभार प्रदर्शन श्री बिनिता शहा मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभागाने मेहनत घेतली.त्यानंतर शाळेचे प्राचार्य, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांनी शाळेचा परिसर स्वच्छ करून श्रमदान केले. याप्रसंगी  महात्मा गांधीजी पुतळ्यापर्यंत रॅली आयोजित करून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व सर्वांनी त्यांना वंदन केले.शाळेचे प्राचार्य श्री संजयकुमार जाधव ,उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

Post a Comment

Previous Post Next Post