नवापूर तालुक्यात महाराजस्व अभियानाचे आयोजन - तहसीलदार दत्तात्रय जाधव

.     नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    शहरातील व तालुक्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर, विद्यार्थी यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागांतर्गत नियमित संबंध येत असतो जनतेस पारदर्शक व तंत्रस्नेही सेवा विहित कालमर्यादेत पोहचवयाच्या उद्देशाने "महाराजस्व अभियान" राबविले जात आहे. या महत्वकांक्षी कार्यक्रमांतर्गत सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी यांचे कामकाज प्राधान्याने होणे अपेक्षित आहे.
   नवापूर तालुक्यातील सर्व क्षेत्रिय महसूल कार्यालय स्तरावर नागरिकांचे विविध प्रकारची कामे, दाखले पुरविण्याच्या हेतूने महसूल मंडळ तसेच ग्राम महसूल अधिकारी यांचे स्तरावर खाली नमूद वेळापत्रकाप्रमाणे मोहीम स्वरुपात्/कैम्प स्वरुपात कामकाज करण्यात येणार आहे. यामध्ये-
१. प्रलंबित फेरफार निर्गत करणे.
२. विविध दाखल प्रदान करणे.
३. नविन आधार/आधार दुरुस्ती कामकाज करणे.
४. सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ देणे.
५. पुरवठा विभाग अंतर्गत नवीन/दुबार शिधापत्रिका, नाव समाविष्ट वगळणी करणे  
६. पाणंद/पांदण/शेत रस्ते लोक सहभागाद्वारे मोकळे करणे,
७. Agri-stack अंतर्गत शेतकरी यांची नोंदणी करणे,
इत्यादी विषयांबाबत नागरिकांना सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. याकामी पुढीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.
.  तरी सर्व मंडळ अधिकारीग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक तसेच विविध विभागाचे अधिकारी/कर्मचारी, महा-ई-सेवा केंद्र चालक यांनी उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने नमूद दिनांकास वेळी आपलेकडील कागदपत्रांसह उपस्थित राहून कामकाज करावे. सदर बाबत कुणीही हयगय अथवा दुर्लक्ष करु नये. निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
    अशी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी प्रसिद्धीस दिली आहे 

Post a Comment

Previous Post Next Post