येथील श्री अनिलशेठ सोमनाथ भामरे (सामोडेकर) आपल्या 35 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून बिर्ला प्रिसीजन टेक्नॉलॉजी लि. कंपनीतुन सेवानिवृत्त झाले असून त्यांनी केलेले कार्य नेहमीच आमच्या स्मरणात राहील तसेच असे सुस्वभावी व कंपनी कामात पारंगत असलेले होतकरू सहकारी आता कदाचित उपलब्ध होतील तसेच शिस्त प्रिय , वक्तशीरपणा आणि सर्वांसोबत हिरारीने काम करणारा सहकारी आज सेवानिवृत्त होत असल्याचे आनंद आहे परंतु दुसरी कडे उद्यापासून कामावर येणार नाही यांचे दु :ख देखील आहे नेहमीच मदतीला तत्परतेने धावुन येणारया आमच्या आण्णासाहेबांना प्रदीर्घ आयुष्य लाभो अशी सहकारी कामगारांनी देवाला प्रार्थना केली.
आजच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विलास ठोके युनियन कमेटी खजिनदार , प्रमोद गायकवाड - अध्यक्ष रामनाथ गुंजाळ , सक्रेटरी विजय ठाकरे आदि उपस्थित होते.
आपल्या सेवेनिवृती नंतरचे आयुष्य सामाजिक, धार्मिक, पारिवारिक कार्यात सहभागी होऊन समाजसेवेत व्यतीत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
Tags:
सामाजिक