नंदुरबार जिल्ह्यातील ३०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नंदुरबार सत्यप्रकाश न्युज 
   नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ३०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदस्थापना देवून बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ३८ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. या CIM पदस्थापनेबाबतचा आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस यांनी जारी केला आहे.
   नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई व चालक पोलीस अंमलदार या संवर्गातील सर्वसाधारण व विनंती बदल्यांवर बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून प्रशासकीय निकड यांचा सांगोपांग करीत आस्थापना मंडळाच्या सदस्यांनी सर्वानुमते पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलींचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस दलातील सुमारे ३०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. सर्वसाधारण बदल्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई, चालक पोलीस अंमलदारांच्या पदस्थापनेने नियुक्त्या देवून बदल्या केल्या आहेत. त्यात २६ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ७१ पोलीस हवालदार, २८ पोलीस नाईक, ५८ पोलीस शिपाई, ९ चालक पोलीस अंमलदार यांची पदस्थापनेतून नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच विनंती बदल्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई, चालक पोलीस अंमलदारांना पदस्थापना दिली आहे. त्यात १२ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, २० पोलीस हवालदार, ७ पोलीस नाईक, ४२ पोलीस शिपाई, २ चालक पोलीस अंमलदार यांना पदस्थापना दिली आहे. महामार्ग सुरक्षा पथक प्रतिनियुक्तीवरुन मुळ घटकात परत आलेल्या पोलीस अंमलदारांनाही पदस्थापना दिली आहे. यामध्ये २५ पोलीस अंमलदारांना पदस्थापना देण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस यांनी जारी केले आहेत. तसेच संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना असलेल्या पोलीस अंमलदारांना बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करणे व बदलीवर कर्मचारी हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post