नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या आदेशाने जिल्ह्यातून वाहतूक होणाऱ्या कृषी पूरक साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यातर्गत नवापुरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी यूरिया वाहून नेणारे वाहन पकडले होते. वाहनातील युरिया औद्योगिक की कृषी वापराचा त्याची तपासणी झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. युरियाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. रात्री विसरवाडी गावाजवळ तहसीलदार दत्तायत्र जाधव यांनी युरिया वाहून नेणारा ट्रक पकडला होता. यावेळी चालकाने मोबाईलमध्ये कागदपत्रे दिल्याने संशय बळावला होता. त्यामुळे त्यांनी वाहनासह युरिया जप्त केला.
तहसीलदारांनी जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांना युरिया जप्त केल्याची माहिती दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश दिले होते. ही कारवाई होणार असल्याने तहसीलदार जाधव
ट्रक ताब्यात घेत विसरवाडी पोलीस ठाण्यात जमा केला होता. सायंकाळी उशिरापर्यंत कृषी विभागाच्या पथकाला वाहतूकदाराने कागदपत्रे दिल्यानंतर हा युरिया विनापरवाना नसल्याचे समोर आले. परंतू युरिया औद्योगिक वापराचा की, कृषी हे स्पष्ट होत नसल्याने त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसांनी त्याचा अहवाल येणार आहे. जिल्ह्यातून कृषी वापराचा युरिया गुजरातमध्ये जात असल्याच्या तक्रारींमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणीचे आदेश काढले आहेत
Tags:
शासकीय