कविताचे भावविश्व या शोभना मधुकर साळुंखे लिखित काव्य संग्रहाचे प्रकाशन आज धुळ्यात अक्षदा लॉन्स मंगल कार्यालय येथे शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील/सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी ताई पाटील या होत्या , तर कविता संग्रहाचे प्रकाशनासाठी राज्यातील सुप्रसिद्ध कवी लेखक व व्याख्याते व पत्रकार मनमाड येथील श्री संदीप देशपांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कवयत्री शोभना साळुंखे या धुळे येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ योगेश साळुंखे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचे शिक्षक दिनेश साळुंखे यांच्या मातोश्री असून, स्त्री रोग तज्ञ डॉ साधना साळुंखे यांच्या सासुबाई आहेत.
त्या जळगाव येथील महानगरपालिका शाळेत सुमारे 39 वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. आपल्या नोकरीच्या दरम्यान त्यांनी आयुष्यभर विविध क्षेत्राचा अनुभव घेत जीवनाच्या चढउतारांवर व आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांवर त्यांनी कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या या कवितांचे प्रकाशन करण्याचा मानस डॉ. श्री योगेश साळुंखे व डॉ. सौ साधना साळुंखे यांचा होता. वडील श्री मधुकर पुरुषोत्तम साळुंखे (सेवानिवृत्त जनरल मॅनेजर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव) रा. खेडगाव यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे, म्हणजेच वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत काल या दोन्ही कार्यक्रमांचा दुग्ध शर्करा योग डॉक्टर साळुंखे यांनी आयोजित केला होता.
जीवन जगत असताना एक आदर्श माता व एक आदर्श पिता म्हणून साळुंखे दांपत्याने आपली मुले घडवले. मुलगा डॉक्टर योगेश साळुंखे सून डॉक्टर साधना साळुंखे दुसरा मुलगा शिक्षक दिनेश साळुंखे सून जयश्री शिक्षिका असे एक सुशिक्षित कुटुंब घडवत असताना समाजाप्रती देखील आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून असंख्य विद्यार्थी कवयत्री साळुंखे यांनी आपल्या जीवनात घडविल्या. समाजात एक आदर्श कुटुंब घडवत असताना आदर्श समाज घडविण्याचे काम देखील त्यांनी केले म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला आहे. अशा या आदर्श साळुंखे कुटुंबाच्या या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील खेडगाव तसेच नाशिक जिल्ह्यातून झोडगे व धुळे जिल्ह्यातून असंख्य आप्तस्वकीय नातेवाईक या अमृत महोत्सव व प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित होते.
कविता संग्रहाचे प्रकाशनासाठी खास अतिथी म्हणून आलेले स्वतः कवि, लेखक, पत्रकार असलेले प्रमुख अतिथी श्री संदीप देशपांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की कवी होणे सर्वांना जमणारी गोष्ट नाही कारण कविता करणे ही काही सोपी गोष्ट नाही. कधी कधी कवितेची पहिली ओळ जानेवारीत लिहिली जाते तर कवितेचा शेवट करण्यास डिसेंबर उगवतो, एवढी ती कठीण गोष्ट आहे आणि कवयत्री शोभना ताईना हा कविता संग्रह पूर्ण करायला २६ वर्ष लागले.
कवयत्री शोभना साळुंखे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सदरचा कवितासंग्रह हा माझ्या वडिलांना समर्पित आहे कारण कविता लिहाव्या ही त्यांची इच्छा होती व त्यांच्या प्रेरणेने ते जरी हयात नसले तरी आजचा हा दिवस त्यांच्यामुळे पहावयास मिळाला म्हणून सदरचा कवितासंग्रह वडिलांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर साधना साळुंखे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. योगेश साळुंखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी ते साठी श्री देसले सर, देसले मॅडम, दिनेश साळुंखे सर व त्यांच्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या सर्व टीमने सहकार्य केले.
Tags:
साहित्यिक