नवापूर। शहरातील गरीब होतकरू व्यावसायीकांची अतिक्रमणने काढल्यास व्यावसायिकाचा नागरपरिषदे समोर आत्मदहनाचा इशारा-----------

नवापूर- प्रतिनिधि
  दोन वर्षांपासून व्यावसायीक कोरोना ( कोविड -१९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या दुकानात जीवन व्यथित करीत आहोत , यात आमच्या परिवारातील काही लोकांचे निधन देखील झालेले आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पुर्ण भारत देश लॉकडाऊन केला होता व सदर कालावधीत आमचे पुर्ण व्यवसाय हे ठप्प झाले असल्याने आमचा व्यवसाय बंद झाला व आम्हाला आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालविणे अत्यंत जिकरीचे झाले आहे . आता जेमतेम आम्ही पुर्वस्थितीत येण्याच्या प्रयत्नात आहोत व यातच आपण उपरोक्त संदर्भीय पत्र दिल्यामुळे आम्हा सर्व व्यावसायीकांना मानसिक त्रास होत आहे . दुकान हे मागील ३० ते ४० वर्षांपासून आम्ही तेथे व्यवसाय करीत असून नियमित नवापूर नगरपरिषद येथे वार्षिक शुल्क अदा करीत आहोत .      
         सदरचे मागील आठवड्यात गावात काही कारणास्तव वैयक्तिक अडचणीस्तव अतिक्रमण काढणेबाबत जे काही आंदोलन चालत होते व यासाठी काहींनी उपोषणे देखील केली यामुळे आपल्या कार्यालयास काही निर्णय घ्यावे लागले व सर्व नियम सर्वांना लागू करण्यात आल्याचे निदर्शनास येत असून यामुळे आम्हा व्यावयायीकांचे आर्थिक , मानसिक व शारीरिक देखील नुकसान होणार आहे . तरी आपणास विनंती की , शहरात घडत असलेले व्यक्तिगत अडचणींबाबत आपण संबंधितांशी चर्चा करावी व योग्य तो निर्णय घ्यावा , यात आम्हा गरीब व्यावसायीकांना अटकविण्यात येऊ नये बाबत आम्ही आपणास विनंती करीत आहोत.
          जर भविष्यात आम्हा व्यावसायीकांवर अतिक्रमण काढण्याबाबतची कार्यवाही आपल्या विभागाकडून करण्यात आली व आमचे व्यावसायीक दुकाने बंद किंवा तोडण्यात आली तर मी निवेदनकर्ता पमा सैय्यद सदर परिसरातील व्यवसायीकांचे हित पाहून आपल्या नवापूर नगरपरिषदेसमोर आत्मदहन करणार आहे ! यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची व प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घेऊन आम्हा व्यवसायीकांचा आपण सहानुभूतिपूर्वक विचार करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी या बाबत आम्ही आपणास विनंती करीत आहोत . सदरचे निवेदन हे मी केवळ माझ्यासाठी नाही , सदरचे निवेदन हे मी मुस्लिम हिंदु व सर्व समाजातील व्यावसायीकांसाठी करीत आहे !
              तसेच हे निवेदन मी पमा सैय्यद सर्व अतिक्रमण व्यवसायायीकांचा प्रतिनीघी म्हणून नवापूर तहसीलदार यांना दिले व सर्व व्यथा सांगितली.

Post a Comment

Previous Post Next Post