भिवंडी महाविद्यालयात बचत गट महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न! ------------

भिवंडी दि.१०(मनिलाल शिंपी) 
पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचलित बी. एन. एन. महाविद्यालय भिवंडी व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 
पद्मश्री अण्णासाहेब जाधव जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने बचत गट महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक ९/२/२०२२ रोजी बी. एन. एन. महाविद्यालय भिवंडी येथे करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन  दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते  रिबीन कापुन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले, यावेळी भारतीय समाज उन्नती  मंडळाचे सरचिटणीस श्री.आर.एन.पिंजारी, महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्या डॉ.के.एन.पाटणकर- जैन, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य भिवंडी महाविद्यालयांच्या राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ.श्री. रवींद्र  रसाळ, IQAC चे चेअरमन को-ऑर्डिनेटर डॉ.श्री.एस्.आर. म्हाळूंणकर,
भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉ.राजू रूपवते, अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.कल्पना मुळे , अर्थशास्त्र विषयाचे प्रा.डॉ. विकास उबाळे , अर्थशास्त्र विषयाचे प्रा.मिलिंद , अर्थशास्त्र विभागाचे प्रा.संजय मुंढे , हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.पगारे, उर्दू विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. रईस राऊनक, राज्यशास्त्र विषयाचे प्रा. मयुरेश देशपांडे , क्रीडा विभागाचे डायरेक्टर डॉ. चंद्रकांत म्हात्रे. आदी मान्यवर प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि कला शाखेचे महाविद्यालयीन विद्यार्थी वर्ग उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास विभागाचे प्रमुख प्रा. निनाद विजय जाधव यांनी केले.
अण्णासाहेब जाधव जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने आज या ठिकाणी ग्रामविकास विभागा च्या  माध्यमातून बचत गट महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. तसेच आर. एस .पी .कमांडर तथा महाराष्ट्र राज्याचे राजदूत डॉ. श्री. मणिलाल रतिलाल शिंपी यांनी माझा पत्रकार क्षेत्रातील कार्याचा लेखा जोखा महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भुवनेश्वर ओडीसा यांना सादर केला होता, त्यामुळे त्यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या संस्थेच्या वतीने मानद डॉक्टरेट जाहीर केली. व ती मानद पदवी राज भवन मुंबई येथे प्रदान करण्यात आली, त्याबद्दल डॉ.श्री.मणिलाल शिंपी यांचे मनापासून आभार मानतो, 
तसेच  उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगेन की, मी ही तुमच्यासारखाच एक विद्यार्थी म्हणून बाकावर बसणारा होतो,
व आज प्रमुख पाहुणा म्हणून
तुमच्यासमोर उभा आहे त्यामुळे तुम्ही ही 
बचत गट महोत्सवाच्या माध्यमातून  आपल्या अंगातील कलागुणांना वाव देऊन आपल्या महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक करावे अशा मी शुभेच्छा देतो,
उपस्थित सर्वांनी बचत गट महोत्सवाच्या माध्यमातून उद्योजक क्षेत्राकडे वळविण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे त्याचा विद्यार्थी वर्गाने फायदा करून घ्यावा कारण छोट्या व्यवसायावरून आपण मोठे उद्योजक कसे होऊ हे शिकता येते असे अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करताना दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा भिवंडी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. श्री .किशोर पाटील यांनी सांगितले, 
महात्मा गांधीजींचे ब्रीदवाक्य खेड्याकडे चला, कारण ग्रामीण विकास महत्त्वाचा आहे खेडी सुधरली तर राष्ट्र सुधरू शकतो राष्ट्र सुधारले तर संपूर्ण देश बदलू शकतो, व चांगली प्रगती करू शकतो, कारण जळगाव जिल्ह्यातील बादल या गावातून बचत गटाच्या माध्यमातून गोदडी परदेशात पोचली आहे असे यावेळी संस्थेचे सचिव श्री.आर.एन.पिंजारी यांनी सांगितले ,
बचत गटांना केंद्र सरकार व राज्य 
सरकारकडून निधी दिला जातो कारण त्यांच्याकडूनच बचत गट सुरू करण्यात आले आहेत, यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे ,कारण बँका ,केंद्र शासन व राज्य सरकार यांच्याकडून कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य मिळतो व महिला या त्यामुळेच आर्थिक बचत करायला शिकल्या त्याचबरोबर त्या सक्षम बनून आपले कुटुंब सांभाळू लागल्या असे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.श्री.अशोक वाघ यांनी  सांगितले. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांचे अभिनंदन करते कारण त्यांना पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट राज्यपालांच्या हस्ते मिळाली आहे म्हणून, त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाचे प्रमुख प्राध्यापक श्री निनाद विजय जाधव व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करते कारण त्यांनी प्राध्यापक भांगरे यांच्यानंतर या विभागाची धुरा उत्तम प्रकारे सांभाळली आहे, आज या ठिकाणी चांगला उपक्रम राबवून महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे  असे यावेळी  उपप्राचार्या  डॉ.के.एन. पाटणकर यांनी सांगितले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  व  आभार प्रदर्शन मराठी विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.डोंगरदिवे यांनी केले,
या कार्यक्रमांमध्ये  सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग सहभागी झाले व कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून प्रा.निनाद विजय जाधव यांनी ग्रामीण विकास विषयाचा विभाग प्रमुख म्हणून सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post