पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षास-------------------------- महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकरांची भेट स्वबळावर व्यवसाय करणाऱ्या महिलांचा झाला सत्कार--------

नंदुरबार, दि.10  (जिमाका वृत्तसेवा) : '
महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर  यांच्या उपस्थितीत नंदुरबार मध्ये जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षास भेट दिली. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार  आदि उपस्थित होते.

श्रीमती चाकणकर यांनी महिला सहाय्य कक्षास भेट  देवून तेथील कामकाजाची पाहणी केली व कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच महिला सहाय्य कक्ष येथे समझोता झालेल्या पलक थारणी, गिता पाटील, सोनाली जावरे, अनिता कुंभार, रामी गावीत या कुटूंबाचा सत्कार केला. तसेच स्वबळावर व्यवसाय करणाऱ्या श्रध्दा भेलांडे, गायत्री कोळी, आरती चौधरी, गायत्री समाधान कोळी व कल्पना पाटील या महिलांचाही श्रीमती. चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्वबळावर व्यवसाय करणाऱ्या उज्वला माळी यांच्या भाजीपाला दुकानाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पोलीस विभागातर्फे महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. जिल्हा पोलीस दलातर्फे महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post