सूररत्न संगित महाविद्यालयात संगित प्रेमी तर्फे स्व.लता दिदिंना श्रध्दांजली अर्पण------

नवापूर- सत्यप्रकाश न्युज 
   येथील सूररत्न संगित महाविद्यालयात देशाची गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
      यासाठी  नवापूर येथील प्रसिद्ध उद्योगीनी डॉ. तेजल बेन चोखावाला, उद्योगिनी व नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शितलबेन वाणी , हस्ती बॅंकेचे संचालक श्री नितीन भाई वाणी महाविद्यालयाचे मार्गदर्शक भानुदास रामोळे संचालिका सौ रत्ना रामाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय लतादीदींना त्यांचीच जुनी व अतिशय प्रसिद्ध असलेली  गीते सादर करून स्व. दीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
      कार्यक्रमाची सुरुवात  उपस्थित मान्यवरांचा हस्ते पूष्प अर्पण करून  ये मेरे वतन के लोगो या गीताला महाविद्यालयातील विद्यार्थी चेतन प्रकाश खैरनार  याच्या     हार्मोनियम  वादनाने सुरूवात करण्यात आली यावेळेस भानुदास रामोळे यांनी तुम्हि हो माता पिता तुमी हो हे गीत सादर केले सौ.शितलबेन वाणी  यांनी लग जा गले , नितीन भाई  वाणी व शितलबेन वाणी यांनी कोरा कागज था मेरा ,महाविद्यालयाचे मार्गदर्शक भानुदास रामोळे,संचालिका सौ.रत्ना रामोळे यांनी झिल मिल सितारोंका,व एक प्यार का नग्मा है शंकर साठे यांनी समूहासह   अकेले है चले आओ,बालक्रूष्ण ठोंबरे,यांनी सादर केली तर कू.वेदिका चव्हाण हिने लग जा गले. 
   श्रीमती विजया पाटील  यांनी लतादीदीं वर तयार केलेली कविता सादर केली तर प्रकाश खैरनार यांनी स्व. लतादीदींनी  गुजराती भाषेत एकमेव गायलेले असे दिकरी तो पार थापन केवाय हे गीत  सादर केले .
   यावेळी .सूररत्न संगित महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रदीप पाटील सर प्रतीक पाटील सुधांशू रामोळे शहरातील संगित प्रेमी संदिप चव्हाण,शानाभाउ बच्छाव, प्रा.सौ.कविता खैरनार कुमारी श्रेया सोनार , गौरी खैरनार, अनुष्का भदाने ,लक्ष्मण कदम, प्रदीप पाटील,भाग्येश महाले, क्रिश बच्छाव आदी उपस्थित होते  कार्यक्रमाचे प्रास्ताविक भानुदास रामोळे व  सूत्रसंचालन प्रकाश खैरनार यांनी केले यावेळी शोक मग्न वातावरण स्व. दीदींना अतिशय जड अंतकरणाने शहरातील संगीतप्रेमींनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पित केली.
===========================

Post a Comment

Previous Post Next Post