नवापूर येथील संवेदन बहुउद्देशीय फाउंडेशन नवापूर आयोजित महिला स्वयंरोजगार मिळाल्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सदर आयोजन महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना नियमाचे पालन करून मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ स्टॉल विक्रेता सुलोचना चौधरी तसेच सविता तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्वयंरोजगार मेळाव्यात पुरणपोळी पाव वडा, दही वडा कचोरी ,पापडी तसेच विविध ड्रेस मटेरियल, यांचे स्टॉल लावण्यात आले होते. यात
विविध खाद्यपदार्थ चे जवळपास 35 स्टोल या स्वयंरोजगार कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दिली. हा कार्यक्रम याचे आयोजन अध्यक्ष डॉ मंदा मोरे नीतू शर्मा रुपाली जगताप, शैला शिंपी, निर्मला चौधरी, कविता खैरणार, मनिषा गिरासे, स्वाती महाजन, मीनल लोहार, चित्रा चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती नगराध्यक्षा हेमलताताई पाटील, नगरसेविका सविता नगराळे, डॉ.अर्चना नगराळे, नगरसेविका मंगला सैन, समाजसेविका मृदुला भंडारकर, योग शिक्षक निलिमा माळी तसेच सर्व समाजातील महिला मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवला.