स्वधा संस्था कल्याण यांच्या सौजन्याने व आर एस पी युनिट यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराला भरघोस प्रतिसाद---------

कल्याण - ( मनिलाल शिंपी)
   विविध समाज जागृतीचे उपक्रम राबवीणाऱ्या स्वधा संस्थेच्या वतीने  बुधवार दिनांक ४/३/२०२२  व ५/३/२०२२ रोजी  माणकोली नाका  वाहतूक कार्यालय येथे नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. श्याम पाटील पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा अंजुर फाटा, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील , आर. एस.पी  ठाणे जिल्हा  युनिटचे कमांडर  डॉ.श्री.मणिलाल रतिलाल शिंपी, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन  खातर ,सहाय्यक पोलीस अधिकारी वाहतूक श्री. सोमनाथ कर्नावट,वाहतूक पोलीस श्री.एस.एच.तडवी ,श्री.गणेश सावंत, श्री.चौधरी, श्री विलास पाटील,  व आदी मान्यवर
यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नेत्र तपासणी साठी श्री विठ्ठल बडे (उपाध्यक्ष - शासकीय नेत्र चिकित्सा अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य) श्री. शशिकांत पाटील (सहाय्यक नेत्र चिकिस्तक )श्री.सागर लोटवानी (टेक्निशियन) यांनी काम पाहिले. सदर शिबिरात एकूण २१२ रुग्णांची तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. सदर शिबिर हे
सोमवार दि. ७/३/२०२२ रोजी  अंजुर फाटा खारबाव रोड या ठिकाणी होणार असल्याची माहिती यावेळी मोनाली रॉय यांनी दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली. नेत्र तपासणी चष्मे वाटप शिबिर हे ९ मार्च २०२२ तारखेपर्यंत  भिवंडीत विविध ठिकाणी सतत सात दिवस सुरू राहणार असल्याची माहिती स्वधा संस्थेच्या अध्यक्षा ईवा  अथाविया यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना दिली. सदर नेत्र चिकित्सा शिबीर व चष्मे वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
स्वधा संस्था सोशल अप्लिफ़मेन्ट एंड डेव्हलपमेंट फ़ॉर हेल्थ  ॲक्शन कल्याण यांच्या सौजन्याने व आर.एस.पी .युनिट कल्याण-ठाणे , तसेच दैनिक स्वराज्य तोरण चारीटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने यशस्वी होत आहे. हा संपूर्ण शिबिर यशस्वी करण्यासाठी
 संस्थेच्या अध्यक्षा ईवा  अथाविया यांच्या  मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सभासद मोनाली रॉय, तेसी फ़्रेडी, कौशिक मजुमदार, मोहित ठाकूर, शिवाजी भोईर, छाया गरुड ,प्रितेश शेलार यांनी विशेष मेहनत घेत आहेत. 
तरी या नेत्र तपासणी शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून नेत्रतपासणी शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन स्वधा संस्थेच्या अध्यक्षा ईवा  अथाविया  यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून विशेष करून वाहन चालक वर्गाला केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post