वनप्रेमी सस्नेह सी. अवसरमल
वनपरिक्षेत्र अधिकारी
वृक्षवल्ली आम्हा सोयरे
केवळ हाच ध्यास मनाशी ठेवून
जंगलात राहून वन्यजीवांची व वृक्षाची जतन करणे हे पाहिजे तेवढे सोपे नसून तर मोठ्या जिक्रिचे आहे, असे माहिती असून सुध्दा केवळ बालपणापासून वृक्ष संवर्धनाच्या आवडी मुळे व तसेच झाडे लावा,झाडे जगवा या उद्देशाने आणि जंगलात नेहमीच ऑक्सिजन मिळतो व जंगलाचे संरक्षण करता येते याच आवडीने शासकिय सेवेसाठी वनविभाग निवडला.तर 1990 ते 95 या काळात नवापूर वनविभागातील सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी आजोबा रघुनाथ अवसरमल व वनविभागात कार्यरत असलेले पिता चंद्रकांत अवसरमल यांच्या प्रेरणेने वनविभात वृक्षांची सेवा करून जंगल कसे वाचवता येईल या हेतूनेच वनविभाग निवडला.
धुळे येथील महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असतांना क्रिडा क्षेत्रात देखील नेहमीच अग्रेसर होत्या. म्हणून त्या टेबल टेनिस, उंच उडी ,रनिंगमध्ये अग्रस्थानी राहयाच्या व आपल्या काळात सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच नेतृत्व करण्याची आवड असल्याने व विविध ठिकाणी प्रशंसनीय नेतृत्व केल्यामुळे
आनंद गुरुकुल, अकोला या संस्थे कडून उत्कृष्ट नेतृत्वाचा पुरस्कार मा.स्नेहल अवसरमल यांना प्रदान करण्यात आला वनविभागात सेवा करण्यासाठी
पद्व्युत्तर शिक्षणानंतर वनविभागाच्या परिक्षा देऊन राउंड ऑफिसर पदावरून त्या सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्य केल्यानंतर नवापूर वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या.
तसेच साहित्य , संगित, व वक्तृत्व स्पर्धेत देखील आपला प्रभाव असलेल्या मा. स्नेहल अवसरमल म्हणतात की महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल नवापूर तालुक्यातून असून नवापूर शहरातील व परिसरातील जंगल अत्यंत घनदाट आहे. येथे रात्री बे रात्री वावरताना जीवाची बाजी लावून काम करावे लागते. परंतू नवापूर वनविभागातील महिला सहकारी महिला असून सुध्दा कुठल्या प्रकारचा काम चूकारपणा न करता आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने पारपाडत याचा आनंद त्या व्यक्त करतात.
आपला परिवार व वन संरक्षण यामध्ये वनसंरक्षनाला आपले आद्य कर्तव्य समजून मोठ्या आनंदात व उत्साहात आले काम करीत आहे.
वनविभागात सेवा करतांना स्वतःला नशीबवान समजतात कारण येथे नैसर्गिक वातावरणात राहून ऑक्सिजन मिळतो जो सर्वांचा नशीबी नाहि. सोबत जंगलातील वृक्षांचे संरक्षण करण्यात जो आनंद असतो तो वेगळाच असतो व हे सर्व करतांना रोज नवनवीन अनुभव मिळतो तो आनंद वेगळाच.
हो जंगलात राहणे एवढे सोपे नसून ते देखील नवापूर सारख्या घनदाट जंगलात काम करतांना ते महिलेला कारण कधीकधी जीवाशी देखील खेळावे लागते पण सर्व काहि परमेश्वरावर व नशिबावर सोडून आम्ही महिला कर्मचारी कार्य करत असो.
हे सर्व करतांना मातापित्यांचा आशिर्वाद व पतिपर्मेश्वरांची साथ ब बालगोपाल सहकार्य तेवढेच महत्वाचे त्या मानतात.
संदेश:- आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त एकच संदेश देऊ इच्छिता कि कुठलीच भीती मनाशी न बाळगता आपल्या हिमतीवर आपले काम करा प्रत्त्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संरक्षण करून जंगलाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे कारण जंंगल असेल तर भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही. नाहीतर आपल्या पाठीवर ऑक्सिजन चा बाटला घेऊन फिरावे लाागेल कारण कोरोना काळातील गंभीर परिस्थिती अत्यंत भयानक होती व ती तुम्हाआम्हास खूप काही शिकवून गेली. म्हणूनच जंगल वाचणे महत्त्वाचे आहेत. स्वतःसाठीच एक झाड लावणे गरजेचे आहे.
अशा प्रेरणादायक वनश्री
मा.स्नेहल अवसरमल यांना जागतिक महिला दिनाच्या व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
सामजिक कार्यक्रमात भरारी असलेल्या सौ. निशा अजीतकुमार जायस्वाल
M.Com.
बालपणापासून समाजसेवा व सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवसेवा हीच ईश्वरसेवा समजून | तळागाळातील गुणवंत व यशवंत व्यक्तींना पुढे जाण्यासाठी नवापूर शहरातील सौ. निशा अजीतकुमार जयस्वाल या मार्गदर्शन करत आहेत.
नवापुरातील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ए.जी. जयस्वाल यांचे मार्गदर्शन व ज्येष्ठ साहित्यिक मृणाल भांडारकर यांच्या प्रेरणेने सौ. निशा जायस्वाल या 'अस्तित्व' ग्रुपमध्ये सहभागी झाल्या आहेत. परिवाराला सांभाळून आपल्या अंगी असलेले सुप्तगुण दाखवून इतरांना प्रेरणा देणारा हा ग्रुप आहे. ज्याने आपल्यासह इतरांचादेखील उत्साह वाढतो व तणाव दूर होतो. अशा ग्रुपच्या सदस्य होण्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. ग्रुपद्वारे होणारे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन तन-मन-धनाने सदर कार्यक्रमाच्या आयोजनात त्या आनंदाने सहभागी होतात. तालुक्यातील बंधारपाडा येथे असलेल्या मुकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी वस्तू देऊन त्या सहकार्य करतात. तसेच संगीत रजनी सारख्या कार्यक्रमाच्या आयोजनासह महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी, वेशभूषा या स्पर्धांना परीक्षक म्हणून त्यांनी स्पर्धकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मकरसंक्रांतीला लाडू व ३१ डिसेंबरला गरिबांना कपडे देऊन त्यांच्या आनंदात आपला आनंद साजरा करतात. समाजातील महिलांना एकत्रित करण्यासाठी घरोघरी जाऊन समाज संघटनांचे महत्व समजावतात. जयस्वाल समाज संत सहस्रार्जुन जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम करण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर असून उपाध्यक्ष पदाची धुरा अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. त्या स्वतः वाणिज्य शाखेच्या आहेत. आपल्या दोन्ही मुलींनादेखील शिक्षण त्यांनी अग्रेसर ठेवले आहे. पती डॉ. जयस्वाल यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते व इतरांना देखील सहभागी करतात.
सामाजिक कार्यात सदैव तन,मन,धनाने तत्पर असलेल्या सौ.निशा जायस्वाल यांना जागतिक महिला दिनानिमित्त व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.============================
शिक्षणासह साहित्यात रूची असलेल्या
मा.सौ.सरला राहुल साळुंखे
व्यवसायः-प्रा.शिक्षिका प.स.नवापूर
शिक्षणः-बी ए.इंग्लिश ,एम ए इतिहास.डी.एड,डी एस एम,
पदः-१)जिल्हाध्यक्ष.काव्यप्रेमी शिक्षक मंच,शाखा नंदुरबार
२)संचालिका,धुळे व नंदुरबार जिल्हा प्रा.शिक्षकांची पतसंस्था
विशेष आवडः-वाचन,गायन,सांस्कृतिक कार्यक्रम बसविणे,सूत्रसंचालन,लेखन,चित्रकला.
सामाजिक कार्यः-
वृक्षारोपणात सहभागी,पर्यावरणपूरक संदेश.
अनेकवेळा रक्तदान.
शै.कार्यः-
शाळा डिजीटल करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
तंबाखूमुक्त विषयक काव्यस्पर्धेतील सहभागाबद्दल मा.मुख्याधिकारी डाॕ.कलशेट्टी साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान.
पुरस्कारः-
१)शिवकाव्य पुरस्कार अक्कलकोट
२)राज्यस्तरीय श्री साई काव्यगौरव पुरस्कार
३)अनेक काव्यसंमेलनात सहभाग व सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह प्राप्त
उपक्रमशिल शिक्षिका
यांचा लेखणी सरलाची हा काव्यसंग्रह प्रसिध्द
शिक्षणासह, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या
नांव :- प्रा. सौ. कविता प्रकाश खैरनार
शिक्षण : M.A.B.ed.इंग्रजी,मराठी
सध्या असलेले पद :- म.का.सदस्या अ.भा. शिंपी समाज महिला मंडळ भूषवलेली पदे :- अध्यक्षा शिंपी समाज महिला मंडळ नवापूर
मा. सचिव :- धनदाई बहुउद्देशीय संस्था
सदस्य :- संवेदन फाउंडेशन नवापूर
राबविलेले उपक्रम :- महिला मंडळ अध्यक्षतेच्या कालावधीत तिन वर्षे समाजाच्या महिलांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठि व विविध स्पर्धांचे आयोजन करून यशस्वी स्पर्धकांचा सन्मान केला, तसेच संत नामदेव महाराज पुण्यतिथी व हळदी कुंकू कार्यक्रमात सुत्रसंचालन करून शहरातील विश्व हिंदू परिषद आयोजित भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून समाजाचे नांव गौरव प्राप्त करण्यासाठी
सहभाग.
१) अस्तित्व ग्रुप आयोजित महिला दिनानिमित्त बेटि बचाओ बेटि पढाओ या नाटकात प्रमुख भूमिका सहभाग.
२) संवेदन फाउंडेशन आयोजित आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबीर, प्रथम कन्यारत्न मातेचा सन्मान व विविध कार्यक्रमात सहभागी.
३) काव्यप्रेमी शिक्षकमंच आयोजित राज्यस्तरीय बहुउददेशीय संस्था नवापूर काव्य संमेलनात व खान्देश साहित्य संघ आयोजित काव्य संमेलनात काव्य वाचन केले.
४) शालेय स्तरावरील व सामाजिक कार्यक्रमात परिक्षक म्हणून कार्य भविष्यात समाजाच्या शालेय विद्यार्थ्यांसाठि स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच महिलांसाठी बेटि बचाओ बेटि पढाओ, बचत गट व घर बसल्या रोजगार प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न. शिवण क्लास, महेंदि क्लास, संगणक केंद्र स्थापन करून धनदाई बहुउददेशीय संस्था द्वारा मानस आहे.
पुरस्कार -
* अंकुर साहित्य संघ आयोजित निबंध स्पर्धेत नंदादीप पुरस्काराने सन्मानित.
* सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते कानुश्री पुरस्काराने सन्मानित.
* जेसीस क्लब, महिला मंडळ व तसेच लोकमत सखी यांद्वारे आयोजित विविध स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक प्राप्त. ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷