ठाणे (मनिलाल शिंपी)::
अ.भा.शिपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या माजी महिला अध्यक्ष सुमनताई ब्राम्हणकर यांच्या पुढाकाराने, दिनांक ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'महिला आरोग्य समस्या व निराकारण' या विषयावर डॉ.पल्लवी बारटके, अबुधाबी, संयुक्त अरब अमिरात, यांचे आँनलाईन वेबीनार ठेवण्यात आले होते. 'स्वतः बनूनि सहाण, संसारात ओतते पंचप्राण', या ओळींचा दाखला देत डॉ. पल्लवी बारटके यांनी स्त्री आरोग्यावर खूप उपयुक्त माहिती सांगितली. तसेच स्त्रिया कुटुंबाचा कणा असतात त्यामुळे त्यांनी स्वतःला सुदृढ राखणे खूप आवश्यक आहे यावर भर दिला व उपस्थित भगिनींच्या शंकांचे निरसन केले. श्रीमती सुमनताई ब्राह्मणकर यांनी स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्यातील सुप्त गुणांना वाव देत, आपल्या कर्तृत्वाने आदर्श समाज घडवण्यास मदत केली पाहिजे असे प्रतिपादन केले.आणि उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
अतिशय स्तुत्य उपक्रम 👏
ReplyDelete