शहरातील नवापूर तालुका महिला मंडळाच्या वतीने पाण्याचा बचतीसाठी कूपनलिका रिचार्ज (Water Harvesting)
हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांत ज्या नागरिकांना आपल्या बोरिंग रिचार्ज करावयाचा असतील त्यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे आपला देश अमृतमहोत्सव साजरा करित असून या उपक्रमात देखील शहरातील 79 नागरिकांनी सहभाग नोंदविला असून या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
पाणी वाचविण्यासाठी 25 वर्षापूर्वी स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प.पू.पांडूरंग शास्री आठवले यांनी हा प्रयोग केला होता व हा प्रयोग नवापूर महिला मंडळाच्या सदस्यांनी समजावून घेतला होता व या उपक्रमात एका पावसाळ्यात सुमारे 65 ते 70,000 लिटर पाणी या कूपनलिका रिचार्ज केल्याने धरती मातेला पुन्हा प्राप्त होते व म्हणजे जलपूर्नभरण होते तसेच एकप्रकारे धरतीमातेला लाखो लिटर पाणी दान होत असते.याचा आपल्यालाच फायदा असून या भगीरथ कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजपर्यंत या कार्यात शहरातील 79 परिवाराने तर काहि परिवारांकडे 2 पेक्षा जास्त बोअरींगाना कूपनलिका रिचार्ज करून पाणी वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे महिलामंडळाच्या मुख्य सदस्यांपासून या उपक्रमाला सुरवात झाली त्यात सौ.मीराबेन विपीनभाई चोखावाला, श्रध्दा विकास शाह,अर्चना राकेश शाह,अनुराधा राजीव शाह,डॉ.तेजल विपीनभाई चोखावाला,विनिता जिग्नेश शाह जास्मिन राकेश पटेल, कोमल परेश शाह, पारूल राकेश मिस्री, मेघा अनिल पाटील.
यांच्यासह शहरातील प्रा.विजया सोनार,अॅड. राखी अनिल शर्मा, नगराध्यक्षा हेमलताताई अजय पाटील, शारदा ज्ञानचंद अग्रवाल, जयश्री सूधिर निकम,मीनाक्षी नंदूभाई सोनार, शितल नितीन वाणी,सिमरण अमोल दिवटे,योगिता रूपेश पाटील, रजनी सूधिर पाटील, आशा संजय शर्मा, पुष्पा अनिल चौधरी, चारूशिला नानासाहेब बर्डे,नीतू हरिष पटेल, हरिष शांताराम सोनार, दर्शन गिरीश लखनानी, दिपक सुभाष पाटील, सुचिता राजेंद्र साळुंखे, वैशाली राजेंद्र भावसार, शिखा हेमंत अग्रवाल, सरोज चंपक चंपकलाल अग्रवाल, चंपकलाल विनोदिलाल अग्रवाल, हर्षा शैलेंद्र पाटील, वैशाली दर्शन पाटील, शालिनी संजय पाटील, हर्षा दिनेश पाटील, मेघा हेमंत जाधव, शैलेश पी.अग्रवाल, शैलेंद्र दिलीप पाटील, भारती चंद्रवदन पाटील, छाया चुनीलाल पाटील, सरयू बिपिनचंद्र पटेल, मनिषा गौरव अग्रवाल, प्राचार्य संजय कुमार लोटन जाधव, प्रविन विश्वास पाटील, मनोहर रामकृष्ण मेखे, शशिकांत गोविंद भदाणे,धर्मेश बाबुलाल परदेशी,किरण शिवदास पाटील, अनिल एम.शाह,महेश झेड.रामनानी,नितीन बा.ठाकरे,दर्शन प्रताप पाटील, हरिष प्रताप पाटील, संजय किरण पाटील, डॉ.विशाल प्रविण पाटील, डाॅ.आशुतोष गुलाब वाडिले,स्वप्नील प्रभाकर महाजन, चेतन लक्ष्मण घरटे,राकेश श्रीपत पाटील, मयुर पंढरीनाथ वाणी,डाॅ.चंद्रशेखर शिवाजी पाटील, डाॅ.सुधीर पाटील, नरेंद्र पंडीतराव पाटील, डाॅ.अमित एस.मावची,डाॅ.मंदा अभेसिंग गावीत, प्रा.उमेश भरत पाटील, माजी नगराध्यक्ष विपीनभाई चोखावाला,डाॅ.अजय कूवर,शितल राजेंद्र जयस्वाल, डॉ. जयेश कांतिलाल अग्रवाल, नितीन गिरधर वाणी,तेजश्री तेजस भदाणे,शैलेश अग्रवाल, जयंती प्रभूभाई पंचाल,अल्या अशरफ घरैया,ईश्वर प्रजापत, शैलेश प्रजापत, आदि नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमात सहभाग नोंदविला असून या उपक्रमामुळे नवापूर शहरात व परिसरात हजारो लिटर पाणी जमिनीला परत मिळत असून आज तरी पाण्याची उणीव भासत नसून अद्याप या उपक्रमात ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल अशा नागरिकांनी महिला मंडळाच्या सदस्यांना संपर्क करावा असे आवाहन नवापूर तालुका महिला मंडळातर्फे करण्यात येत आहे.