शहरातील सुररत्न संगीत विद्यालय नवापूर तर्फे विद्यालयातील संगीत विशारद पदवी संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संचालिका सौ रत्ना रामोळे यांच्या कडून करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर मोरे आठगाव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोन (भिवंडी) जिल्हा ठाणे यांच्या हस्ते सत्कारार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळेस प्रमुख अतिथी म्हणून पालिकेचे सेवानिवृत्त कक्ष अधिकारी मिलिंद भामरे, उत्कृष्ट तबलावादक व गायक राहुल खैरनार, संगीत प्रेमी अमोल कांबळे, प्रकाश खैरनार आदि उपस्थित होते.
त्यानंतर विद्यालयातील संगीत विशारद गायन या विषयात कल्पना भामरे, वर्षा साळुंके, रत्ना रामोळे यांचा तर राहुल खैरनार यांचे तबला विषयातील तबला विशारद सुधांशू रामोळे व शुभम थोरात यांचा सत्कार करण्यात आला. बारावी विज्ञान शाखेतील राजश्री खराटे, अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली शितल मोरे तसेच कॉम्पुटर इंजीनियरिंग विषयात प्रावीण्य संपादन केलेले सारंग मोरे यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला.
सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी आप आपली मनोगते व्यक्त केली मधुकर मोरे यांनी संगीत जीवनातील स्थान व महत्त्व सर्वांना स्पष्ट करून सांगितले व भविष्यातही हा अनमोल खजाना कसा अबाधित ठेवता येईल याबद्दल खुलासा केला.
यावेळि संगीत विशारद हेमलता साळुंके, अमोल कांबळे, इंदिरा खराटे, विजय खराटे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयाचे मार्गदर्शक भानुदास रामोळे तर आभार संचालिका सौ.रत्ना रामोळे यांनी व्यक्त केले
Tags:
सगित