येथील कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय विसरवाडी येथील माजी प्राचार्य डॉ.ए.टी. पाटील यांचा सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य ॲड.पी.एन. देशपांडे, प्रमुख अतिथी माजी आमदार प्रा. इंद्रसिंगजी वसावे, माजी प्राचार्य डॉ.बी.एस.पाटील, सेवापूर्ती सत्कारमूर्ती डॉ.ए.टी. पाटील व त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या अर्धांगिनी मंगलाबाई पाटील उपस्थित होते.
सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य ॲड.पी.एन. देशपांडे मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वतीचे पूजन करून व स्वागत समारंभातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य, प्रमुख अतिथी, सरांचे कुटुंबीय व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींना स्नेहवस्त्र, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना ॲड.पी.एन. देशपांडे पुढे म्हणाले की, त्यांच्या महाविद्यालयाला मिळालेली विविध पुरस्कार ही त्यांच्या उत्तम सेवेची खरी पावती आहे. सेवापूर्ती नंतर त्यांनी आपल्या जीवनक्रमात बदल करून आयुष्यातील राहिलेल्या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. पुढील काळात त्यांना सेवा व उत्तम स्वास्थ्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
माजी प्राचार्य डॉ.ए.टी. पाटील यांनी आपल्या सत्कारपर भाषणात पूर्वानुभव कथन करतांना आपल्या जीवनातील विविध घटित संघर्षमयी प्रसंग कथन केले. कै. यशवंत पाटील यांच्या प्रेरणेने शिक्षणाची यशस्वी सुरुवात झाली. उच्च शिक्षण साठीचे प्रेरणाश्रोत कै.काशिनाथ पाटील यांची मदत झाली. कुटुंबवत्सलतेची व कुटुंबाला पुढे नेण्याची प्रेरणा माझ्या आईकडून मिळाली. एक प्रशासक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणी आल्या असतील परंतु विध्यार्थी व संस्था हिताला प्राधान्य देत कार्य केले. महाविद्यालयीन प्रगतीसाठी कार्य करतांना वि. एज्यु. सोसा. चे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री दादासो माणिकराव गावीत, विद्यमान अध्यक्ष भरतभाऊ गावीत, माजी प्राचार्य अशोक शिंदे व सन्माननीय संचालक मंडळाने जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवत कर्मचारी वर्गाच्या व कुटुंबाच्या उत्तम सहकार्यामुळे महाविद्यालयाची प्रगती करू शकलो.
आज माझे विदयार्थी विविध पदांवर उत्तम कार्य करतांना बघून मोठे समाधान लाभते. आयुष्यात विदयार्थी हिताला प्राधान्य देऊन महाविद्यालयाच्या हितासाठी कार्य केले. आपण सर्व दिग्गजांची उपस्थिती बघून मी भारावून गेलो आहे. आपल्या प्रेम व सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे.
सेवापूर्ती कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यात माजी आमदार प्रा. इंद्रसिंग वसावे, माजी प्राचार्य डॉ.बी.एस.पाटील, प्राचार्य डॉ.ए.पी. खैरनार, चिंतामणी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन युवराज पाटील, प्राचार्य डॉ.आर.आर अहिरे, प्रा.डॉ.डी.वाय. पाटील, उपप्राचार्य एन. बी. पाटील, सन्मित्र शायर राशीदखान लोहार, सरांचे व्याही डॉ.एल.डी. पाटील, मुलगी योगेश्री वाघ या सर्व मान्यवरांनी सरांच्या उत्तम कार्यशैली, कामातील सुसूत्रता, महाविद्यालाय व परिवारातील समतोल या सारख्या विविध कार्याचा गौरव करत सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सेवापूर्ती समारंभाचे यशस्वी आयोजन चिरंजीव डॉ कुणाल बच्छाव, डॉ मानसी बच्छाव, मोठी मुलगी योगेश्री वाघ, मोठे जावई, आनंद वाघ, लहान मुलगी राजश्री पाटील, जावई जयेश पाटील प्रा.डॉ. मधुकर देसले, डॉ. गणेश महाजन, प्रा.डॉ. विशाल कर्पे यांनी केले.
कार्यक्रमात राजाराम पाटील, धुडकू भदाणे, अभियंता संदीप शिंदे, सन्मित्र प्रा.डॉ.एस. के. शेलार उपस्थित होते. या कार्यक्रमाला विध्यापिठ परिक्षेत्रातून विविध मान्यवर, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, डॉ.वाय.व्ही. पाटील, डॉ. सर्जेराव भामरे, डॉ. मुकेश रघुवंशी, डॉ. लता मोरे,राजेंद्र काकूस्ते, डॉ.डी.एस. पाटील, सुभाष पाटील, मान्यवरांची, ग्रामस्थ व अनेक नातेवाईकांची उपस्थिती लाभली होती.
Thank you very much🙏
ReplyDelete