येथील "मार्च" शिक्षण संस्था संचालित वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. डी. ए. कदम मॅडम ह्यांच्या सेवापूर्ती निमित्त संस्था व विद्यालयाच्या वतीने त्यांना संस्कृतिक परंपरेने यथोचित गौरवासह निरोप देण्यात आला.ह्या प्रसंगी संस्थेचे मानद सचिव मा. श्री अनीलभाई पाटील ,अध्यक्षा श्रीमती सरलाताई गोविंदराव वसावे, मानद खजिनदार.मा. श्री भरतदादा पाटील, संचालिका मा. सौ.संगीताबेन पाटील, संचालक मा. डॉ. श्री. चेतनकुमार पाटील,मा.श्री.विनयकुमार वसावे. आणि सत्कारमूर्ती सौ कदम मॅडम, श्री अरुण कदम सर व्यासपीठावर उपस्थित होते.
संस्था संचालित आदर्श प्राथमिक शाळा आणि आदर्श बालवाडीचे अध्यापक वृंद देखील उपस्थित होता. श्री अतुल वसावे पर्यवेक्षक श्री सी बी बेंद्रे सौ. एल के .पाटील सौ संगीता वेताळ श्री आर .डी. भामरे, श्री ज्ञानेश्वर पुराणिक श्री प्रकाश सैदाने मुख्याध्यापक श्री मनोज पाटील ह्या शिक्षक बंधू भगिनीनी मॅडमांच्या कार्याचा आणि सेवेचा गौरव आपल्या मनोगतातून केला मानद खजिनदार श्री भरतदादा पाटील यांनी मॅडमांच्या कामगिरी चे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणातून मानद सचिव श्री अनिलभाई पाटील यांनी मॅडमांच्या सेवकालातील कार्याचे यथोचित मूल्यमापन करून त्यांना पुढील आनंदी व निरामय आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे संचालन श्री भटू जाधव, ऋण निर्देश श्री चंद्रशेखर बेंद्रे यांनी व्यक्त केले.