संगीत हा जीवनातील अविभाज्य घटक असून ते ग्रहण करण्यासाठि कोणतीही वयोमर्यादा नसून संगीत हे जीवनात महत्त्वाचे असून संगीताला सर्वत्र स्थान असे मत येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई संचलित, सुर रत्न संगीत महाविद्यालय नवापूर, येथील 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभात नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ.शितलबेन वाणी/चोखावाला यांनी मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नवापूर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.हेमलताताई अजय पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून डाॅ..तेजलबेन चोखावाला,संचालिका नवापूर एज्युकेशन सोसायटी मा.सौ.रत्ना रामोळे संचालिका, सुर रत्न संगीत विद्यालय प्रकाश वाय. खैरनार उपाध्यक्ष, दैनिक पत्रकार संस्था नवापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले तर आज बालगांधर्व नारायण श्रीपाद राजहंस व वंदेमातरम या राष्ट्रगाण चे कवि बंकीमचंद्र चॅटर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून ईशस्तवनाने सुरुवात करण्यात आली,तदनंतर प्रारंभिक गायनाच्या विदयार्थीनीनी स्वागत गीत सादर केले.
आपल्या मनोगतात पुढे शितलबेन वाणी म्हणाले आज सूररत्न संगित महाविद्यालयामुळे शहरातील लहान बालकांपासून तर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सर्वानाच संगीत शिकायची संधी मिळाली व मिळणार आहे याचा लाभ आपण सर्वांनी अवश्य घ्यायलाच हवा,यावेळी वासरवेल येथील जि.प.शाळेतील परिक्षेत सहभागी होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थासह मुख्याध्यापिका ताईबाई गावित यांचे कौतुक करून अभिनंदन केले तर महाविद्यालयाचे रामोळे दांम्पत्याचे आभार व्यक्त केले.
यावेळी सन 2021, सत्र - नोव्हेंबर
१.मनिष प्रकाश गावित
२.प्रियंशी सुरेश गावित
३.तेजस्विनी समुवेल गावित
४.अंजली हरिश्चंद्र गावित
५.स्नेहल अशोक गावित
६.ब्लेसी राहुल गावित
प्रवेशिका प्रथम
१.कुशलकुमार नितीनकुमार माळी
प्रवेशिका पूर्ण
१.संगीता तुकाराम भामरे
२.अर्चना गणपतराव धोत्रे
३.राकेश अशोक ईशी
४.गौरी प्रकाश खैरनार
मध्यमा प्रथम
१.जागृती सुरेश पाटील
२.ज्योती जगन्नाथ कापुरे
३.प्रदीप ईश्वर पाटील
संगीत विशारद
१.वर्षा रविंद्र साळुंके
२.कल्पना मिलिंद भामरे
३.सुधांशू भानुदास रामोळे
४.शुभम प्रशांत थोरात
५.रत्ना भानुदास रामोळे
आदींना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळेस सौ.आशा गुंजाळ,सौ.अर्चना नाईकवाडी, श्रीम.ज्योती कापूरे,कु.वेदिका संदिप चव्हाण, बालकृष्ण ठोंबरे,प्रदीप पाटील, शंकर साठे,कुशलकुमार माळी यांनी मराठी अभंग, भक्तीगीतासह मराठी ,हिंदी देशभक्तीपर गीत सादर केली तर गणेश शिंपी,चि.चेतन प्रकाश खैरनार, यांनी हार्मोनियम वर गीत सादर केली तर गुजराती काव्य म्हणून प्रकाश खैरनार यांनी उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले.
डाॅ.नितीन माळी,कू.बीजल राकेश राणा यांनी मनोगत व्यक्त केले यावेळेस संगीत प्रेमी अमोल कांबळे,सीमाताई गावित, सौ.निलिमा माळी, जयंत गजानन कापुरे, हरिश्चंद्र गावीत, प्रकाश गावीत राहुल गावीत आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खैरनार, प्रास्ताविक भानुदास रामोळे तर आभार सौ.रत्ना रामोळे यांनी व्यक्त केले.
Tags:
संगीत