सार्वजनिक मराठी हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ....

नवापूर-सत्यप्रकाश न्यूज 
  येथील  प्र.अ. सोढा सार्वजनिक हायस्कूल व ए.एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर मधील इ.10 व 12 वीत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय परिवाराकडून सत्कार समारंभ करण्यात आला.
            सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष  नवापूर एज्युकेशन सोसायटीचे  कार्यकुशल उपाध्यक्ष शिरीषभाई शहा, प्रमुख पाहुणे सदस्य रजनीकांतभाई मिस्री, राहुल देसाई मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया, माजी विद्यार्थी विवेक वान्या कूवर पशु वैद्यकीय अधिकारी वर्ग एक, माजी विद्यार्थी भूषण माळी आय आय टी जोधपूर, प्राचार्य मिलिंद वाघ, पर्यवेक्षक श्रीमती के टी वाघ, ए.बी. थोरात उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
             प्राचार्य मिलिंद वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांना  सकारात्मक वृत्ती आत्मसात करून  मेहनत करा व यशस्वी व्हा असा संदेश दिला.
          इ.12 वी  विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक साहील सुलेमान मन्यार, द्वितीय क्रमांक वेदांत हरिशचंद्र सोमवंशी, तृतीय क्रमांक वरुण विशाल जगताप, कला शाखेत प्रथम क्रमांक तानया संजय कोकणी, द्वितीय क्रमांक शिला दौलत कोकणी, तृतीय क्रमांक रशिला छगन गावीत या विध्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला.
              इ 10 वी त प्रथम क्रमांक सुवर्णा अनेश गावीत, द्वितीय क्रमांक भूवनेश्वरी हेमंत वळवी, तृतीय क्रमांक सिध्दी संजय पाटील या विध्यार्थ्यांनाचा पालकांसह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. 
               गुणवंत विद्यार्थ्यांनी  आपल्या मनोगतातून शालेय परिवार व शिक्षकाचे आभार मानले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक यांनी सुद्धा शालेय परीवार व शिक्षकांचे आभार मानले व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगीतले की इ 1 ते 12 वीत प्रवेश घ्यायचा असेल तर सार्वजनिक हायस्कूल हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.
           अध्यक्ष भाषणात शिरीषभाई  शहा यांनी आपल्या मनोगतातून संदेश दिला की उपस्थित विद्यार्थ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन  मेहनत करा, जिद्द ठेवून यशवंत व्हा. आपल्यातील उपजत गुणांचा शोध घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करण्याचा संदेश दिला. 
           गुणवंत विध्यार्थ्यांना सत्कार करण्यासाठीचे सन्मान चिन्ह प्राचार्य मिलिंद वाघ यांच्या सौजन्याने वडील कै. सर्जेराव हरी वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्व गुणवंत विध्यार्थ्यांना सन्मानचिन्ह भेट देण्यात आले.  
              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणेश महाजन व आभार प्रदर्शन श्री.महेंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post