सुरत - सत्यप्रकाश न्युज
येथील शिंपी समाजाचे स्थानिक कार्यकर्ते व मध्यवर्ती संस्थेचे माजी पदाधिकारी यांच्या प्रेरणेतून सुरत शिंपी समाजाचा परंपरेनुसार या वर्षी देखील आषाढी एकादशी निमित्त सुरत शिंपी समाज मंदिरात सकाळी आरती, श्रींची पालखी सोहळा,सोबत भाजप कार्यकर्त्यांनी तुळशी चे रोप वाटप , आलेल्या पांडुरंग भक्तांना साबुदाण्याची खिचडी फराळ,व रात्री सुंदर असे कर्णप्रिय, सुमधुर आवाजात टाळमृदुंगाच्या सोबत भजन कीर्तन व प्रसाद वाटप चे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. सदर कार्यक्रमात समाजातील सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, युवक युवती मंडळ चे पदाधिकारी व स्थानिक शिंपी समाजाचे समाज बांधव, तसेच इतर समाजाचे भाविक भक्त देखील खुप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते व कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.कार्यक्रमाच्या सफलतेसाठी सर्व स्थानिक समाजबांधव व पदाधिकारी यांनी खुप मेहनत घेतली.त्याबद्दल सर्व पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.