शिरोमणी नामदेव महाराज हे आद्य कवी होते आपल्या अभंगवाणी तून समस्त समाजाला एक दिशा देण्याचे काम केले धर्माचा प्रसार करण्यासाठी संत नामदेव महाराज यांनी पंजाब प्रांता पर्यंत जाउन भागवत धर्माची पताका फडकवली ते राष्ट्रीय एकात्मता चे प्रतिक आहे आसे प्रतिपादन जि प सदस्या सौ संगीताताई भरत गावीत यांनी येथील श्री साईनाथ मंदिर येथे नवापूर शिम्पी समाजा तर्फे आयोजित संत शिरोमणी नामदेव महाराज संजिवनी समाधी सोहळा कार्याक्रमा प्रसंगी केले
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी जिल्हा अध्यक्ष भानूदास चव्हाण तर प्रमूख अतिथी म्हणून जि प सदस्या सौ संगीता गावीत मध्यवर्ती संस्थेचे सदस्य दिलीप चव्हाण तालुका अध्यक्ष विजय चव्हाण जेष्ठ समाज बांधव दत्तत्रय अहिराव यूवा अध्यक्ष योगेश जगताप दिनेश खैरनार सचिव प्रविण ब्रम्हे आदी उपस्थित होते यावेळी महीला मंडळा तर्फे पालखी सोहळा आयोजीत करण्यात येउन मान्यवरांच्या हस्ते ईयता १० वी १२ वीत विशेष नैपुण्य घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले प्रसंगी भानूदास चव्हाण , चित्रा सोनवणे ,संगीता खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम चे प्रास्तावीक चित्रा सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन महीला अध्यक्षा शैला शिम्पी यांनी केले रूपाली जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते