येथील ज्येष्ठ नागरिक संघाची सभा शहरातील महात्मा गांधी वाचनालयात संघाचे अध्यक्ष किशोरभाई दलाल यांच्या अध्यक्षतेखालील पालिका मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाङकर ज्येष्ठ सदस्य नगिनभाई अग्रवाल,शिरीषभाई शाह, प्रकाश पाटील, जनसेवा फाउंडेशन पुणे यांचे नंदुरबार जिल्ह्यातील प्रतिनिधी राहुल पवार, सूरेेश पाटील आदींचा उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी मुधलवाङकर पुढे म्हणाले मनुष्य हा माणूस हा मनाने कमजोर होत असतो वयाची 1ते 13 व 60 च्या वरचे वयातील व्यक्तीकडे सहजासहजी दुर्लक्षित होते परंतु येथे उपस्थित सर्व मान्यवर वयाने वृध्द असले तरी मनाने तरूण आहेत आणि या वयात देखील एकसंघ होऊन एवढे सुंदर काम करीत आहेत हे शिकण्या सारखे आहे.हे शरीराने जरी वृध्द दिसत असले तरी मनाने तरूण आहेत हा एक आनंद आहे.आपण कामाची लालसा सोडली तर वृध्दपकाळ जाणवेल, आपली समाजावरील देणे संपले नसून, आपल्या शब्दाला परिवारात मान आहे,म्हणून मनाची बंधने मोकळि करा व आनंदि जीवन व्यतीत करा असे मनोगत व्यक्त केले.
खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने सभेस सुरुवात करण्यात आली तदनंतर शहरातील व देशात शहिद व मयत झालेले नागरिकांना मौन धारण करून श्रध्दांजली वाहण्यात आली.
त्यानंतर देशातील पहिली आदिवासी महिला श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची 15 व्या राष्ट्रपती म्हणुन निवड झाल्याबद्दल टाळयावाजुन अभिनंदन करण्यात आले.
.तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले नगरपालिका मुख्याधिकारी स्वप्निल मुधलवाङकर, जनसेवा फाउंडेशन चे राहुल पवार,सत्यप्रकाश न्युज चे संपादक प्रकाश खैरनार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले संघाचे सदस्य नगिनभाई अग्रवाल, गावीत सह इतर सदस्यांचे वाढदिवस पेन व गुलाब पुष्प देऊन साजरा करण्यात आला
यावेळी उपस्थित जनसेवा फाउंडेशन चे राहुल पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर.14567 हा उपलब्ध करून देण्यात आला असून त्यात या नंबर कार्यान्वित सेवांची माहिती दिली त्यात आरोग्य, उपचार, निवारा,वृध्दाश्रम,अध्यात्मिक, सांस्कृतिक, करमणूक, कायदेविषयक, पेन्शन संबंधित,चिंता,निराकरण, बेघर, अत्याचार ग्रस्त आदींवर मदत मिळणार आहेत. तरी या सेवेचा सर्व सदस्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
ज्येष्ठ सदस्य नगिनभाई अग्रवाल यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे जागेचा प्रश्न मार्गी लावून तिथे येणारे अडथळे दूर करण्याची मागणी मुख्याधिकारी मुधलवाङकर यांच्याकडे केली तर आपल्या संघाच्या सर्व समस्या दूर करण्याचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळेस संघाच्या महिला सदस्यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती ,तसेच हर घर तिरंगा अभियानासाठी नेमीचंद अग्रवाल यांनी 100 ध्वज अभियानात सहभागी होण्यासाठी देण्याचे जाहीर केले.
सभेचे सूत्रसंचालन सचिव सुरेश पाटील यांनी तर विशेष अतिथीचा परिचय श्रीकांत पाठक यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघाच्या सदस्यांनी परिश्रम केलेत.