अन्न व औषध प्रशासनामार्फत विविध आस्थापनावर कारवाई.........

  नंदुरबार जिमाका वृत्तसेवा
      सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ज्या आस्थापनांनी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केले आहे अशा आस्थापनावर अन्न व औषध प्रशासनामार्फत कारवाई केली आहे.
  जिल्हृयात राबविलेल्या मोहिमेत डीमार्ट सुपर मार्ट,नंदुरबार यांनी मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्री केल्याप्रकरणी तर राजु पटेल टी ॲण्ड मिल्क, धडगाव यांचेकडील तपासणीसाठी घेण्यात आलेल्या पाश्चराईच्ड फुल क्रिम मिल्क (गोदावरी ब्रॅण्ड) व मे.रामदेव ट्रेडर्स, हाट दरवाजा, नंदुरबार यांचेकडे कच्ची घाणी शुद्ध मोहरी तेलाचे नमुने या दोन्ही कमी दर्जाच्या अन्नपदार्थाबाबत तपास चौकशी पुर्ण करुन सह आयुक्त नाशिक यांचेकडे कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला आहे. तर श्री.छाजेड एजन्सी, नंदुरबार, मे.डायमंड रेस्टॉरन्ट, नवापूर यांच्यावर तरतुदचे उल्लंघन केल्याप्रकरणी  चौकशी पुर्ण करुन सदर आस्थापनांना प्रत्येकी 12 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अशा प्रकारची नियमित कारवाई जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचेही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post