नंदुरबार शहरातील बॅटरी व इनव्हर्टर चोरी करणारे 02 आरोपी 3 लाख 65 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी......
नंदुरबार सत्यप्रकाश न्युज
मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असून ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते. त्याअनुषंगाने चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
नंदुरबार शहरातील शेख मुस्तफा शेख हसन मण्यार वय-43 वर्ष व्यवसाय व्यापारी रा. पटेलवाडी, नंदुरबार हे यांचे नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात फेमस बॅटरी (GM) नावाचे दुकान असून दिनांक 24/08/2022 रोजीचे पुर्वी 5 ते 6 महिने त्यांच्या दुकानातील 3,65.306/ रुपये किमतीच्या विविध प्रकाराच्या एकुण 16 बॅटऱ्या व 14 इनव्हर्टर कोणी तरी त्यांच्या दुकानातून चोरुन नेले असल्याचे त्यांना समजल्याने त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुरनं 531/2022 भादवि कलम 380 प्रमाणे दि.25.08.2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशित केले.
Bनंदुरबार शहरातील हाट दरवाजा परिसरातील फेमस दुकानातील बॅट-या पटेलवाडी भागात राहणारा व दुकानात काम करणारा सुफियान शेख याने चोरुन नेले असल्याची गोपनीय बातमी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना मिळाल्याने सदरची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सांगून बातमीची खात्री करून तात्काळ संशयीत सुफियान शेख यास ताब्यात घेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील सुफियान शेख याचे बाबत गोपनीय माहिती काढली असता सुफियान शेख हा दिनांक 25/08/2022 रोजी हाट दरवाजा परिसरात येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्याठिकाणी सापळा रचून सुफियान शेख यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुफियान रज्जाक शेख, वय-24 वर्षे,
पटेलवाडी, नंदुरबार असे सांगितले. सुफियान शेख यास फेमस बॅटरी दुकानातील चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने मागील 5 ते 6 महिन्यात फेमस बॅटरी या दुकानातून 16 बॅटऱ्या व 14 इनव्हर्टर चोरी केल्याचे कबुल केले परंतु तो त्या बॅटऱ्या कोठे ठेवलेल्या आहेत याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर देत नव्हता, म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून सखोल विचारपूस केली असता त्याने त्या बॅटऱ्या व इनव्हर्टर तळोदा शहरातील मयुर भामरे यास विक्री केले असल्याचे सांगितले.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तळोदा येथे जावून मयुर भामरे याचे कटलरी दुकानाची माहिती काढली तळोदा शहरातील हनुमान मंदीरा समोर मयुर भामरे याचे दुकान असल्याचे समजून आले. त्या दुकानात जावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयुर अरुण भामरे, वय 28, रा. गुरुकुल नगर, नंदुरबार यास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे सुफियान शेख याने दिलेल्या बॅटऱ्या व इनव्हर्टरबाबत विचारपूस केली असता तो सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर त्यास पुन्हा विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यास सुफियान शेख याने दिलेल्या बॅटऱ्या व इनव्हर्टर ह्या त्याच्या दुकानाच्या मागील बाजूस ठेवलेबाबत सांगितल्याने मथुर भामरे याचे कटलरी दुकानाच्या मागील बाजुस असलेल्या खोलीतून 3 लाख 65 हजार 306 रुपये किमतीच्या 16 बॅट-या व 14 इनव्हर्टर कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
ताब्यात घेण्यात आलेले 1) सुफियान रज्जाक शेख, वय- 24 वर्षे, रा. पटेलवाडी, नंदुरबार 2) मयुर अरुण भामरे, वय 28, रा. गुरुकुल नगर, नंदुरबार यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील पोलीस हवालदार राकेश वसावे, पोलीस नाईक राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत, आनंदा मराठे रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने