नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या व गणेश भक्तांच्या अडचणी व तक्रारींसाठी हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत.....

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या व गणेश भक्तांच्या अडचणी व तक्रारींसाठी हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत
नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज 
     दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव काळात मंडळांच्या व गणेश भक्तांच्या अडचणी तसेच तक्रारीचे निवारण करण्यसाठी पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे 24 तास लाईन सेवा कार्यान्वीत करण्यात आली असून त्याबाबतचा हेल्पलाईन नंबर हा 7620006402 असा आहे.

दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेशाचे आगमन झाल्यापासून ते दिनांक 09 सप्टेंबर 2022 रोजी विसर्जन होईपावेतो पोलीस विभागाशी संबंधीत कायदा व सुव्यवस्था तसेच इतर विभागांशी संबंधीत तक्रारींचे तात्काळ निरसन व्हावे याकरीता नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून सदरचा हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे.

पोलीस, महावितरण, नगर पालिका, नगर पंचायत, ग्राम पंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग. आरोग्य विभाग व महसूल विभाग यासारख्या विभागांशी संबंधीत असलेल्या अडचणी व तक्रारी याबाबत सदर क्रमांकावर संपर्क साधून द्यावी. तसेच पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी संबंधित विभागाशी संपर्क साधून तक्रारीचे निराकरण करुन घेतील. तसेच संबंधित तक्रारदार यास तक्रारीचे निराकरण झाले किया कसे? याबाबतची खात्री स्वत: नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील हे करणार आहेत.
   नंदुरबार जिल्ह्यातील मंडळiaran गणेश भक्तांना गणेशोत्सवाशी संबंधीत कोणतीही तक्रार असल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post