कर सल्लागारांसाठि युक्तीच्या गोष्टी चार या नावाने राज्यातील व विशेषतः उत्तर महाराष्ट्रामधील, आयकर- जीएसटी, विक्रीकर या सारख्या,कर क्षेत्रात काम करणाऱ्या तमाम कर व्यावसायिकांसाठी नासिक येथील, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने, येत्या २ सप्टेंबर २०२२ रोजी, सायंकाळी ५ वा.आभासी चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, ते राज्यभरातल्या, सर्व कर सल्लागारांसाठी खुले आहे.
मुंबई येथील राज्यव्यापी जी.एस.टी.पी.असोसिएशनचे श्री सुनील खुशलानी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असून,निवृत्त राज्यकर आयुक्त श्री सुमेरकुमार काले
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत.
आयकर तसेच जीएसटी कायद्यामध्ये वारंवार होणारे बदल, नवनवीन तरतुदी, नियमांमुळे कर क्षेत्रात काम करणाऱ्या कर सल्लागारांच्या व्यावसायिक कार्यपद्धती मध्ये त्याला कशा प्रकारे बदल करून घ्यावा लागतो, तसेच आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या व कर्तव्ये यांचा मेळ घालून, व्यवसायाचे नियोजन कशा पद्धतीने करायला हवे या बाबतीत, पुणे येथील ऍड. श्री नरेंद्र सोनवणे, सांगली येथील प्रख्यात कर सल्लागार ऍड. श्री किशोर लुल्ला, तसेच नासिक येथील कर सल्लागार श्री अनिल चव्हाण* हे मार्गदर्शन करणार आहेत.
करक्षेत्रात काम करणाऱ्या तसेच नवोदित कर व्यावसायिकांना या वेबिनारचा निश्चित फायदा होणार असून, अतिशय महत्वपूर्ण विषयावर, अशा प्रकारचे, खुले चर्चासत्र प्रथमच आयोजित करण्यात आले असल्याची माहिती श्री श्रीपाद बेदरकर यांनी दिली असून, या चर्चासत्राचा सर्व कर व्यावसायिकांनी लाभ घेण्याचे आवाहन नॉर्थ महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव श्री नितिन डोंगरे, संयोजक श्री प्रकाश विसपुते यांनी केले आहे.
Tags:
व्यावसायिक