वासरवेल तालुका नवापूर येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा.........

वासरवेल तालुका नवापूर येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा
नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
      जिल्हा परिषद शाळा वासरवेल तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व 76 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हजारोहण अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती श्री प्रकाश कृष्णा गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सहशिक्षिका ताई गावित, अनिल गावित शिक्षण प्रेमी, विग्नीताई गावित, उर्मिला गावित, हरिश्चंद्र गावित, सुनंदा गावित, मालिनी गावित, डायना गावित, गीता गावित, महिमा गावित, उषा गावित, अरुणा गावित, नीता गावित, अजित गावित, रविकिरण गावित, जितेंद्र गावित, राहुल गावित, नामी गावित, रूथा गावित, अश्विनी गावित, सीमा गावित, मनीषा गावित, यमुना गावित, प्रमिला गावित, अनिता गावित, उज्वला गावित, हन्ना गावित, रविता गावित, तसेच विद्यार्थ्यांचे पालक बंधू भगिनी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
निपुण भारत FLN प्रभावी अंमलबजावणीसाठी इयत्ता 1 ते 3 वर्गांतील मातांचे माता पालक गट तयार करण्यात आले. यामध्ये तीन गटांची निर्मिती करण्यात आली प्रत्येक गटासाठी लीडर माता निवडली गेली, तिन्ही गटांचा स्वतंत्र वाटसप ग्रुप तयार करण्यात आला या ग्रुपवर दर आठवड्यात ऑडिओ तथा व्हिडिओ पाठवले जातील अशा सूचना देण्यात आल्या. दरमहा सर्व मातांची आढावा बैठक व कार्यशाळा घेतली जाईल अशी सूचना मुख्याध्यापक श्रीरामोळे यांनी उपस्थित सर्व मातांना दिली त्याचप्रमाणे या माता पालक गटातील उपक्रमांचे फोटो व त्यांच्या ऍक्टिव्हिटी संग्रहित करून त्या राज्यस्तरीय लिंक वर अपलोड करण्यात येतील असे देखील मुख्याध्यापक यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post