नवापूर - सत्यप्रकाश न्यूज
दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीकृष्णजयंतीनिमित्त सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा डूबास बिल्डिंग नवापूर शाळेत आज गोपाळकृष्णाच्या पूजनासह 'दहीहंडी'चा कार्यक्रम साजरा झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश पाटील होते.
प्रथम अध्यक्षांच्या हस्ते बालकृष्णाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सण-उत्सवांची माहिती व्हावी त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता बालवाडीतील १८ विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण यांची वेशभूषा करून आले होते. त्यांच्यासमवेत माता पालकांचीही उपस्थिती होती.
उपस्थित सर्व शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी व वेशभूषा करून आलेले राधाकृष्ण यांच्या रासलीलांनी सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळेतील प्रांगण वृंदावन झाले.
शेवटी राधाकृष्ण यांची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री महेश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यशस्वीतेसाठी उपशिक्षिका श्रीमती मनीषा भदाणे, श्रीमती योगिता पाटील, श्रीमती माधुरी चित्ते, श्रीमती मीना तांबोळी, श्रीमती करुणा पाटील, श्रीमती हेमलता पाटील, श्रीमती रेसा मावची यांनी परिश्रम केले.
Tags:
धार्मिक