नवापूर येथील नेहरूनगर भोईगल्ली येथे झाड रोपनसह संगोपन कार्यक्रम...........

नवापूर येथील नेहरूनगर भोईगल्ली येथे झाड रोपनसह संगोपन कार्यक्रम.......
नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
      अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सप्ताहाचे औचित्य साधून आज नेहरुनगर, भोई समाज मंदिर गार्डन येथे लावलेल्या झाडांची निगा,निंदणी,खत-काळी माती लावणी,पिंजऱ्याची उंची वाढविणे,गवत निंदणी करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. *स्व.शेवंताई जगदाळे ह्यांच्या स्मृती* प्रित्यर्थ लावलेली झाडे गल्लीतील सर्व्यांनी काळजी घेतल्याने मोठी झाल्याने त्यात तारजाळी फसून झाडांचे नुकसान होत होते.कटर मशीनने जाळी काढुन नवीन झाडे शमी,कढी पत्ता,आवळा,देवचांदनी आदि झाडे लावण्याचे आली.सौ.संगिता जगदाळे ह्यांनी त्यांचा *वाढदिवस साजरा न करता झाडरोप भेट म्हणून दिलीत.* यापूर्वी लावलेली झाडे उंच झाल्याने जाळी बाहेर आलीत.गुरे ढोरे खात होती.त्या झाडांची जाळीची उंची वाढविण्यात आली. श्रीमती पुष्पा निकम ह्यांनी जाळीला बांधण्यासाठी साडी कापड दिले. *ओन्ली एलआयसी* चे श्री.सुधीर निकम ह्यांनी नंदुरबार हुन झाडरोप आणण्यास परिश्रम घेतले. झाडफांद्यांची ब्युटीपार्लर करून छाटनी करण्यात आली.शेणखत,काळी माती लावण्यात आली.ही सर्व संगोपनाची कामे वृक्षमित्र इंजि.बबनराव जगदाळे, श्री.वर्मा ड्रायव्हर,लिटल इंजेल्सचे शिक्षक श्री.महेंद्र वामनराव अहिरे,श्री.अशोक पेंटर, सुळीचे श्री.अमर गावित,श्री.रशीद गावित, विजय इलेट्रोनिक्सचे श्री.विजय सोनवणे ,वाहतूक ठेकेदार लहान चिंचपाड्याचे श्री.मोहन मिस्त्री गावित ह्यांच्या मदतीने व देखरेखीखाली करण्यात आली.*बाळ झाड़रोपांचे औक्षण पुजा* कु.खुशी (भाविका)सुरेश जगदाळे, कु.प्रांजल (परी)बळवंत खैरनार,कु.सेजल लाडे ह्यांनी केले. *ह्या कामात लहान मुलांना पर्यावरण महत्व ,ज्ञान मिळावे म्हणून* लहान गोपाळ मंडळीतील *मंगलमूर्ती मंडळ* सदस्य आयुष्य रवींद्र पवार,यश दशरथ नगराळे,क्रीश सुनील पेंढारकर, प्रेम संजय साळवे,ज्ञानदीप दत्तू नगराळे,जय अश्विन मराठे,हार्दिक अनिल भोई,दक्ष प्रताप ढोले,आयुष् विनोद मोरे,आयुष् अजय मोहने रुतीका संतोष भोई,खुशी भोई,मंथन पंकज भोई, *श्री.भोईराज गणपती मंडळाचे* अक्षय मोहने आकाश मोहने,चंकी मोरे,विक्रम ढोले,विवेक मोहनेे ,हितेश मोहनेे,नागेश मोरे,कमलेश मोरे,संदीप भोई,रितेश ढोले,कमलेश ढोले, राज मोरे,महेश मोहने,परेश भोई,कुवर मोहनेे आदि सदस्यांनी ह्या पर्यावरणपूरक झाड संगोपन, स्वच्छता मोहिमेत भाग सहभाग नोंदविला. श्री.गणरायाचे थोड्याच दिवसात आगमन होणार असल्याने समाज मंगल कार्यालय गार्डन परिसर स्वच्छ करण्यात आला.सर्व्यांचा रविवार पर्यावरण कामी सार्थकी लागला

Post a Comment

Previous Post Next Post