नंदुरबार जिल्हा संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न
नंदूरबार:- सत्यप्रकाश न्यूज
नंदुरबार जिल्हा संस्था चालक संघटनेची सर्वसाधारण सभेची बैठक महाराष्ट्र राज्य संस्थाचालक संघटनेचे कार्यवाह तथा नंदुरबार संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज झराळी, नंदुरबार येथे दिनांक 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आली. या बैठकीत मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी मार्गदर्शन करतांना जिल्यातील शिक्षण विभागाच्या विविध अडचणीबाबत सर्व संस्था चालकांनी एकत्रित काम करणे आवश्यक असून येणाऱ्या विविध अडचणी बाबत जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येईल, त्याचप्रमाणे शिक्षण विभागाच्या राज्यात सर्व ठिकाणी सारख्याच अडचणी व प्रश्न असून या मागण्या संदर्भात लवकरच माननीय शिक्षण मंत्री मा.ना. दिपक केसरकर यांच्याकडे बैठक घेण्याबाबत विनंती करण्यात येईल. व टप्प्याटप्प्याने आपल्या मागण्या कशा मान्य करता येतील याबाबत आग्रह धरण्यात येईल. त्याचप्रमाणे आदिवासी विकास मंत्री आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे आदिवासी आश्रम शाळांचे विविध प्रश्न लवकरच सोडण्यास ते सहकार्य करतील असे रघुवंशी यांनी प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे माननीय सुप्रीम कोर्टाने झारखंड राज्याच्या एका प्रकरणाबाबत शिक्षकांना पेसा कायद्यातून वगळण्यात यावे व इतर संवर्गातील उमेदवारांना सुद्धा भरती प्रक्रिया सहभागी करण्यात यावे याबाबत नुकताच निर्णय दिला असून त्या निर्णयासंदर्भात शासन पातळीवर लवकरच पत्र व्यवहार करण्यात येईल व पेसा कायदा मधून शिक्षक पदे वगळण्याबाबत विनंती करण्यात येईल असे युवराज पाटील विभागीय सचिव नाशिक विभागीय आश्रम शाळा संस्थाचालक संघटना यांनी माहिती दिली. यशवंत पाटील प्र. अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा संस्थाचालक संघटना यांनी सर्वसाधारण सभेतील सर्व ठराव मांडून ते मंजूर करण्याबाबत विनंती केली, त्याप्रमाणे सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले .या बैठकीला नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 50 शिक्षण संस्था चालक उपस्थित होते, या बैठकीस राजेंद्रकुमार गावित, अभिजीत मोतीलाल पाटील, डॉ. कांतीलाल टाटिया, रोहिदास राठोड सचिव, डॉ.एन.डी.नांद्रे विभागीय सचिव, भास्करराव पाटील, निखिल कुमार तुरखीया, चेतन कुमार पवार, जितेंद्र पाटील, अड.पी. बी.चौधरी, डॉ.वसंत भाई चौधरी, श्रीमती उर्मिला गावित, फारुख पठाण, हजहर सय्यद, शेख वखार हसून, बच्चू सिंग परदेशी, लक्ष्मण माळी, नरेश कांकरिया, निखिल वाणी, प्रताप कदम बांडे, राजेंद्र पटेल, विशाल पाटील, मधुकर पाटील इत्यादी संस्था चालक उपस्थित होते. बैठकीचे आयोजनासाठी पुष्पेंद्र रघुवंशी यांनी सहकार्य केले.