कर्मचाऱ्यांची सर्वंकष माहितीकोषात माहिती अद्ययावत करावी......

कर्मचाऱ्यांची सर्वंकष माहितीकोषात माहिती अद्ययावत करावी.... 
नंदुरबार, दि.24 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सर्वंकष माहितीकोषात सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती 1 जुलै 2022 या संदर्भ दिनांकास अनुसरुन अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी अशोक पाटील यांनी केले आहे.
   माहिती अद्ययावत करण्याचे काम https://mahades.maharashtra.gov.in/CGE/home.do  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. माहिती कशी भरावी या संदर्भात सूचना संचही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  
  सर्व कार्यालयानी माहितीकोष आज्ञावली वापरण्याकरिता माहितीकोष-2021 मधील युजर आयडी व पासवर्ड कायम ठेवण्यात आले आहेत. नव्याने निर्माण झालेल्या कार्यालयांसाठी युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन घेण्यासाठी आहरण व संवितकरण क्रमांक, कार्यालय प्रमुखाचे नाव,तसेच नियंत्रणक अधिकाऱ्यांच्या माहितीसह जिल्हा सांख्यिकी कार्यालयास माहिती सादर करावी. 17 ऑगस्ट  ते 30 ऑगस्ट 2022 पर्यंत आहरण व संवितरण क्रमांक, पदनाम, इत्यादीची कार्यालयाची माहिती सांख्यिकी कार्यालयास सादर करुन माहिती  अद्ययावत सादर करून पहिले प्रमाणपत्र 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्राप्त करुन घ्यावेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्रृटीचे निवारण करुन माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र 1 डिसेंबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत प्राप्त करुन घ्यावे. 
    शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष-2022 माहिती प्राप्त झाल्याचे पहिले प्रमाणपत्र जोडल्याशिवाय माहे नोव्हेंबर 2022 पेन इन डिसेंबर 2022 चे वेतन देयक  कोषागार कार्यालयात स्विकारले जाणार नाही. 
  अधिक माहितीसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय,नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत रुम नंबर 221, टोकरतलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210044, भ्रमणध्वनी क्रमांक 9767263866) वर संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post