22 व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धांचे पोलीस अंमलदाराच्या हस्ते उद्घाटन.....

22 व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धांचे पोलीस अंमलदाराच्या हस्ते उद्घाटन...
नंदुरबार सत्यप्रकाश न्युज                 दिनांक 22/08/2022 ते दिनांक 24/08/2022 रोजी दरम्यान पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या जाणाऱ्या 22 वी नंदुरबार जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक 23/08/2022 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातून ऑगस्ट महिना अखेरीस सेवानिवृत्त होणारे पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील मुख्य क्रिडा प्रशिक्षक सहा. पोलीस उप निरीक्षक श्री. ईश्वर सोमा गावीत यांचे हस्ते ज्योत प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) श्री. विश्वास वळवी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक श्री. आत्माराम प्रधान, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. श्रीकांत घुमरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस खेळाडू उपस्थित होते.
   नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस दलातील कनिष्ठ स्तरावरील सहा. पोलीस उप निरीक्षक श्री. ईश्वर सोमा गावीत यांना संधी देवून पोलीस अमलदाराच्याप्रती असलेली आपुलकी दाखविली.
   जनतेची सुरक्षा हे पोलीसांचे कर्तव्य असून त्यासाठी पोलीस दिवसरात्र मेहनत करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. परंतु रात्रगस्त, गुन्ह्याचे तपासकामी बाहेर गावी बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त इत्यादी अनेक कारणांमुळे पोलीसांचे वैयक्तीक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या व्याधी होवून शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.
   पोलीसांनी जनतेच्या सुरक्षेचे व्रत घेतलेले असून त्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. पोलीसांनी जनतेच्या सुरक्षेसोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, त्यासाठी मैदानी खेळ खेळून आपली शरीरयष्टी उत्तम ठेवणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे मैदानी खेळ खेळल्यामुळे आपली शारीरिक स्थिती उत्तम राहाते व मानसिक ताण तणाव देखील दूर होतो. नियमित मैदानी खेळ खेळल्यामुळे स्वास्थ्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. तसेच पोलीसांना त्यांचे कर्तव्य पार पाडत असतांना बंदोबस्त करण्यासाठी तसेच आरोपीना पकडण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते, म्हणून पोलीस अधिकारी व अमलदार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून मैदानी खेळांसाठी थोडा वेळ काढून मैदानी खेळ खेळावे. तसेचनंदुरबार जिल्हा पोलीस दलाने परिक्षेत्रीय, राज्य स्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर केलेल्या गौरवशाली कामगिरीचा इतिहास सर्वांना सांगितला. तसेच खेळामुळे सांघिक काम करण्याची वृत्तीत वाढ होते असे सांगून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी सर्वांना मार्गदर्शन केले.

दिनांक 22/08/2022 ते दिनांक 24/08/2022 रोजी दरम्यान पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या जाणाऱ्या 22 वी नंदुरबार जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये पोलीस मुख्यालय, नंदुरबार, नंदुरबार विभाग, शहादा विभाग, अक्कलकुवा विभाग असे एकुण 04 संघ हे सांधिक व वैयक्तिक खेळ, यामध्ये स्विमींग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सींग, वेटलिफ्टींग, 100, 200, 400, 800 मीटर धावणे, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल इत्यादी क्रिडा प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक संघामध्ये साधारणतः 60 खेळाडू असे एकुण 240 सांघिक व वैयक्तिक खेळाडू सहभाग घेणार आहेत. तसेच खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती राहावी तसेच पोलीस दलाचा नावलौकिक राहावा याकरीता सर्व खेळाडूंनी शपथ घेतली.
जिल्हा first मध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची नाशिक परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड करण्यात येत असते.

Post a Comment

Previous Post Next Post