जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे*
नंदुरबार, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता प्रदर्शनीय गटासाठी हॉकी स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल,नंदुरबार येथे तर याच दिवशी दुपारी 3 वाजता प्रदर्शनीय गटासाठी रस्सीखेच, रोपस्कीपींग, व्हॉलीबॉलचे अभिनव विद्यालय, नंदुरबार येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता 17 वर्षे मुले व मुली वयोगटासाठी खो-खो स्पर्धेचे तर प्रदर्शनीय गटासाठी टेनिक्वॉईट खेळासाठी यशवंत विद्यालय, नंदुरबार येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो खेळासाठी 26 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रवेशिका जमा कराव्यात. हॉकी खेळासाठी संपर्कासाठी खुलाल शर्मा (9765212301), रस्सीखेच, रोपस्कीपींग, व्हॉलीबॉल खेळासाठी धनराज अहिरे (888844072 ) तर खो-खो खेळासाठी मयूर ठाकरे (9767677056 ) वर संपर्क साधावा.
राष्ट्रीय क्रीडा दिनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करावा तसेच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा कार्यकर्त्यांचा सन्मान करावा,असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती.पाटील यांनी केले आहे.
Tags:
क्रिडा