नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना व गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची पाहणी................

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना व गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची पाहणी
     नंदुरबार सत्यप्रकाश न्युज                      दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव काळात aureat मंडळांना गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारणी करणे, गणेश मंडळाची स्थापना करणे इत्यादी विविध प्रकारच्या परवान्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी जावे लागते त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक खिडकी योजना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
   गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात दिल्या जाणाऱ्या परवानगीसाठी गणेश मंडळांनी https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जावून नागरिकांसाठी विभाग याला क्लीक केल्यानंतर नागरिकांसाठी सेवा यावर क्लिक करावे. त्यानंतर Ganesh Festival Permission Application यावर क्लिक केल्यानंतर Create citizen login यावर माहिती भरल्यानंतर submit करावे. ऑनलाईन अर्ज सुविधा एक खिडकी योजनेद्वारे करता येईल. गणेशोत्सव मंडळाकडून मंडप, स्टेज किंवा गणेश मंडळ स्थापन परवानगी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क नसल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित aritrea मंडळ ज्याठिकाणी गणेश मंडळाची स्थापना तसेच स्टेज, मंडप किंवा इतर देखावे उभारणार आहे. त्या जागेची संबंधित पोलीस ठाण्यामार्फत पाहणी केली जाईल. पायी ये-जा करणाऱ्या लोकांना किंवा वाहनांना त्रास होणार नाही याची खात्री केल्यानंतरच संबंधित गणेश मंडळाला परवाना दिला जाईल. तसेच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मंडळ स्थापन करतेवेळी परवानगी घ्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी केले आहे.
    नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळ्यापासून सुरुवात करुन चिराग मशिद, ईलाही चौक, फडके चौकी, जळका बाजार, दोहशाह तकिया व सोनी विहीर पर्यंत पायी फिरुन पाहणी केली. गणपती विसर्जन मार्गाची पाहणी दरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी मिरवणूक मार्गामध्ये येणारे
महत्वाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, उभारण्यात येणारी बॅरिकेटिंग यांची पाहणी करुन महत्वाच्या सुचना दिल्या. तसेच बंदोबस्ताची आखणी कशा प्रकारे असेल याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
   सदर मार्गाची पाहणी करतेवेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचेसह नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र भदाणे, पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन पटले, उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post